पर्सेंटाईलप्रकरणी याचिका दाखल करणार!

पर्सेंटाईलप्रकरणी याचिका दाखल करणार!

Published on

पर्सेंटाईलप्रकरणी याचिका करण्याची तयारी
सीईटी सेलकडून प्रतिसाद न मिळाल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्य सीईटी सेलकडून मे महिन्यात घेतलेल्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या एमएचटी-सीईटी-२०२५च्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीत १०० पर्सेंटाईल मिळवलेल्या अनेक उमेदवारांना गैरप्रकारे गुण मिळाले आहेत. याबाबत सीईटी सेलने चौकशी करून प्रवेश फेऱ्या तातडीने थांबवण्याची मागणी सह्याद्री इंटरनॅशनल कनिष्‍ठ महाविद्यालयाचे संचालक प्रा. नारायण शिनगारे, प्रा. विवेक डोके आदींनी सीईटी सेलकडे केली. दरम्यान, आमच्या मागणीला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
बारावीतील गुण आणि सीईटीतील पर्सेंटाईलमध्ये विसंगती असल्याचा संशय घोणसे मॅथ अकॅडमी आणि अहिल्यानगर येथील सह्याद्री इंटरनॅशनल कनिष्ठ महाविद्यालयाने व्यक्त केला होता. त्यासंदर्भातील पुरावे त्यांनी आज सीईटी सेलकडे सादर केले. अधिकाऱ्यांनी केवळ आमची बाजू ऐकून घेतली, पण ठोस कारवाईचे कोणतेही आश्वासन दिले नाही. तसेच सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आमची भेट घेण्याचेही टाळले. त्यामुळे राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्हाला न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असे प्रा. शिनगारे यांनी सांगितले.
---
सीईटी सेलचा खुलासा
आमच्याकडे पर्सेंटाइलसंदर्भात कोणत्याही पालकांच्या तक्रारी आल्या नाहीत, तरीही आम्ही आज आलेल्या तक्रारीसंदर्भात संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या तक्रारीत दहावी-बारावी आणि सीईटीच्या पर्सेंटाइलसंदर्भात काही आक्षेप आहेत; परंतु दहावी-बारावीची गुणदान पद्धत आणि सीईटीची पर्सेंटाइल पद्धत या वेगवेगळ्या आहेत. आम्ही विद्यार्थीहित आणि त्यांची गुणवत्ता लक्षात घेतो, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com