पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
५१ हजार २२३ विद्यार्थी दुसऱ्या यादीत प्रवेशाला पात्र
मुंबई, ता. २२ ः तंत्रशिक्षण संचालनालयांच्या अंतर्गत राज्यातील दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक)च्या प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी मंगळवारी (ता. २२) जाहीर झाली. प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या ६३ हजार ७८८ जागांपैकी ५१ हजार २२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ही प्रवेशाची एकूण टक्केवारी ८०.३० टक्के इतकी आहे.
यात पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीक्रमानुसार २८ हजार ९०२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये २२ ते २४ जुलैदरम्यान प्रवेश घेणे आवश्यक असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी दिली.
पॉलिटेक्निकच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ७ जुलै रोजी जाहीर झाली होती. त्यानंतर या फेरीच्या जागांचे वाटप १२ जुलै रोजी करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीचे नियोजन सुरू करण्यात आले होते. त्याची गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर झाली. या यादीसाठी ६३ हजार ७८८ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ८७ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला हेाता. त्यातील ६३ हजार ४६० विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रमासह आपले अर्ज भरून पूर्ण केले होते. त्यातील ५१ हजार २२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्याचे एकूण प्रमाण हे ८०.३० टक्के इतके आहे.
दरम्यान, पहिल्या फेरीमध्ये दहावीत १०० टक्के गुण मिळवलेल्या पाच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला हेाता, तर ९० ते ९६ टक्के गुण मिळवलेल्या तब्बल नऊ हजार १५८ विद्यार्थ्यांचाही यात तसेच ९६ ते ९९ टक्के गुण मिळवलेल्या ५२८ विद्यार्थ्यांनाही पॉलिटेक्निक प्रवेशाला पसंती दर्शवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.