विघटनासाठीचे रसायनही प्रदूषणास कारणीभूत!

विघटनासाठीचे रसायनही प्रदूषणास कारणीभूत!

Published on

विघटनासाठीचे रसायनही प्रदूषणास कारणीभूत!
प्रा. श्याम असोलेकर यांचे मत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः एकही मानवी कृती अशी नाही ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही. त्यातच विसर्जित पीओपीच्या मूर्तींचे साहित्य पुनर्वापर करता येऊ शकते का, हा मूळ प्रश्न असला तरीही त्यासाठी तयार कराव्या लागणाऱ्या रसायनामुळेही प्रदूषण होते, हे विसरून चालणार नाही, असे मत पर्यावरणतज्ज्ञ प्रा. श्याम असोलेकर यांनी व्यक्त केले. तसेच न्यायालयाचा निर्णय नक्कीच एक पुढचे पाऊल आहे का, यावर बोलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
पीओपीच्या सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्तींचे विसर्जन हे यापुढे कृत्रिम तलावातच होणार, हा उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्थ आहे. परंतु तसे असले तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे दगडापेक्षा वीट बरी अशातला हा प्रकार असल्याचे मत पर्यावरणप्रेमी आणि याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने मोठ्या पीओपीच्या मूर्तींना समुद्रासह नैसर्गित जलाशयात विसर्जनास परवानगी दिली आहे. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी विसर्जित केलेल्या मूर्तींचा मलबा काढण्यात येईल, असा दावा केला आहे. त्यासाठी कोटींचा निधी वापराला जाणार आहे. तो निधी आरोग्य अथवा अन्य कल्याणकारी योजनांसाठी वापरला जाऊ शकतो, असेही जोशी यांना सांगितले. तसेच मुंबई एमएमआर क्षेत्रातमध्ये समुद्र, नद्या, खाड्या इत्यादी ठिकाणी गणेश विसर्जन केले जाते. या प्रत्येक ठिकाणी सरकार अथवा स्थानिक पालिका प्रशासन मलबा हटविण्याची सोय करणार आहे का; समुद्र, नद्या, खाडी यातून विसर्जित मूर्तींचा मलबा काढण्यात आल्यानंतर त्याचे काय करणार, मूर्ती पीओपीची की शाडू मातीची यासाठी लाल रंगाची निशाणी लावण्यात येणार आहे. लाखोंच्या संख्येने घरगुती आणि सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी येतात. प्रत्येक मूर्ती तपासली जाणार आहे का, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. सगळे कागदोपत्री राहणार असल्याची टीकाही जोशी यांनी केली. हे सर्व काही आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गणेश मंडळांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय डाव असल्याचा आरोपही रोहित जोशी यांनी केला.
...
उपरोधिक टोला
सहा फुटांवरील पीओपी मूर्तींना सार्वजनिक जलाशयात विसर्जनाची मुभा दिल्यानंतर अनेक गणेश मंडळे आता आपल्या मूर्तीची उंची वाढवू शकतात, असा उपरोधिक टोला भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे गिरीश राऊत यांनी लगावला. श्रद्धा आणि विज्ञान, पर्यारण हे हातात हात घालून राहू शकतात. फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे ते म्हणाले. मुंबईतील माहीम आणि दादरच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होते. या दोन्ही ठिकाणी मिठी आणि अन्य नद्यांचे दूषित पाणी येऊन मिळते. त्यात पीओपीचा भर नको. दररोज मिठी नदी औद्योगिकरणाचे रसायन घेऊन समुद्राला मिळते. आपण नद्या, नाल्यांना हानी पोहोचवत असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com