अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारे रॅकेट उघड
अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारे रॅकेट उघड
पुण्यातील अवैध कॉल सेंटरवर ‘सीबीआय’चा छापा
मुंबई, ता. २७ : अमेरिकन नागरिकांना आर्थिक गंडा घालणारे मुंबई, पुण्यातील रॅकेट केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उघडकीस आणले. या आरोपींनी पुण्यात थाटलेले अवैध कॉल सेंटरही या कारवाईदरम्यान उद्ध्वस्त करण्यात आले.
सीबीआय प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार २४ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. त्यात कॉल सेंटर चालविणाऱ्या अमित दुबे , तरुण शेणई आणि सॅविओ गोंसाल्विस या तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींकडून सुमारे १० लाखांची बेहिशोबी रोकड आणि अमली पदार्थांचा साठाही जप्त करण्यात आला. त्यासोबत सायबर फसवणुकीशी संबंधित बरीच कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावे हाती लागले. आरोपी कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधत त्यांना अमेरिकेच्या इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस, सिटीझनशीप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस या यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून खोट्या प्रकरणांमध्ये गोवण्याची धमकी देत त्यांच्याकडून ५०० ते तीन हजार अमेरिकन डॉलर इतकी खंडणी उकळत होते, ही रक्कम आरोपी बिटकॉइन किंवा गिफ्ट कार्डच्या माध्यमातून स्वीकारत असल्याची माहिती पुढे आली. सीबीआय प्रवक्त्यानुसार ही टोळी महिन्याला तीन ते चार कोटींची फसवणूक करत होती. ही रक्कम आभासी चलन, बनावट बँक खाती आणि हवाला व्यवहारांद्वारे अंतर फिरवली जात होती.
बँक कर्मचाऱ्यांची साथ
तपासादरम्यान या आरोपींना मुंबई, पुण्यातील शासकीय, खासगी बँकांच्या कर्मचाऱ्यांची साथ होती, असे निष्पन्न झाले आहे. हे कर्मचारी आरोपींना फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेली बँक खाती उपलब्ध करून देत असल्याचे सीबीआय प्रवक्त्याने स्पष्ट केले. अटक आरोपींसोबत चार बँक कर्मचाऱ्यांविरोधातही गुन्हे नोंद केल्याचे या वेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.