पालिका आयुक्त राज ठाकरेंच्या भेटीला
पालिका आयुक्त राज ठाकरेंच्या भेटीला
‘शिवतीर्थ’वर पाऊण तास चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दिलेली अनपेक्षित भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. ही भेट पाऊण तास चालली. याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
आयुक्त गगराणी यांनी आज सकाळी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची पाहणी केली. या वेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला, सूचना ऐकून घेतल्या; मात्र त्यानंतर थेट राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट ठरवून घेतली की अचानक घडली, याबाबतही तर्क लावले जात आहेत. आयुक्तांनी याआधी कधीही राज ठाकरे यांच्या बंगल्यावर भेट दिली नव्हती.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भेट झाली; मात्र कशासाठी व काय चर्चा झाली, याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमकी चर्चा कशावर झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
महापालिकेतील भ्रष्टाचार, छत्रपती शिवाजी पार्कची दुरवस्था किंवा अलीकडेच चर्चेत असलेले घनकचरा व्यवस्थापन खात्यातील खासगीकरण या कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी २१ फेब्रुवारी २०२५ रोजी राज ठाकरे यांनी स्वतः महापालिका मुख्यालयात जाऊन गगराणी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता आयुक्तांनीच राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे या भेटीला विशेष राजकीय अर्थ लावला जात आहे.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.