मालेगाव बॉम्बस्फोट : घटनाक्रम अन्‌ तपास

मालेगाव बॉम्बस्फोट : घटनाक्रम अन्‌ तपास

Published on

मालेगाव बॉम्बस्फोट : घटनाक्रम अन्‌ तपास
- २९ सप्टेंबर २००८च्या रात्री ९.३५ वाजता मालेगावच्या अंजुमन आणि भिकू चौकात, शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर शक्तिशाली बॉम्बस्फोटात सहा जण ठार, तर १०१ जण जखमी झाले. रमझान महिन्याचा तो काळ होता, तर दुसऱ्या दिवशी घटस्थापना होती.
- घटनास्थळी पार्क केलेल्या एलएमएल फ्रीडम (एमएच १५ पी ४५७२) या दुचाकीवर आरोपींनी इम्प्रोवाइज एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी)च्या माध्यमातून हा स्फोट घडवून आणण्यात आला.
एटीएसने केलेल्या तपासात हा स्फोट अभिनव भारत संघटनेच्या कार्यकर्त्या आणि माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि त्यांच्या समविचारी कार्यकर्त्यांनी घडवल्याचे उघड झाले. आरोपींनी जानेवारी २००८ ते २३ सप्टेंबर २००८ दरम्यान किल्ले रायगडसह देशात विविध ठिकाणी बैठका घेऊन कट रचल्याचे उघड.
- सरकार पक्षाने एकूण ३२३ साक्षीदार तपासले. त्यातील २८२ साक्षीदारांनी जबाबानुसार न्यायालयात पुरावा दिला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान २६ साक्षीदारांच्या मृत्यू झाला, तर ३९ साक्षीदारांनी आपला जबाब फिरवला.
- भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर द्विवेदी या सात जणांविरोधात खटला चालला.

कोणावर कोणते आरोप?
- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर : बॉम्बस्फोटांच्या कटात सहभागी. बहुतांश बैठकांना हजेरी. बॉम्ब ठेवण्यासाठी स्वतःची दुचाकी सहआरोपींना दिली.
- निवृत्त मेजर रमेश उपाध्याय : कटात सहभागी आरोपींना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप
- निवृत्त ले. कर्नल पुरोहित : बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा एटीएस, एनआयएचा निष्कर्ष. बॉम्बसाठी आवश्यक आरडीएक्स काश्मीरमधून महाराष्ट्रात आणले. लष्करात असताना अभिनव भारत या हिंदुत्ववादी, हिंसक संघटनेची स्थापना. संघटनेच्या हिंसक कारवायांसाठी आवश्यक शस्त्रसामग्री विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फंडिंग गोळा केले.
- समीर कुलकर्णी : बॉम्ब तयार करण्यापासून तो ठेवण्यापर्यंत आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री उपलब्ध करणे
- अजय राहीरकर - अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेचा कोषाध्यक्ष, गुन्ह्यासाठी आर्थिक तजवीज आणि कटात प्रत्यक्ष सहभाग.
- सुधाकर द्विवेदी - दयानंद पांडे, स्वामी अमृतानंद देवतीर्थ या उपनावांनी ओळख. जम्मू-काश्मीरचा रहिवासी असून स्वयंघोषित शंकराचार्य. बॉम्बस्फोट कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा एनआयएचा दावा.
- सुधाकर चतुर्वेदी : बॉम्बस्फोटाच्या नियोजनात सहभाग. अटक झाली तेव्हा शस्त्रसाठा जप्त.
- २०१०मध्ये या प्रकरणाचा तपास आणि खटल्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेवर (एमआयए) सोपविण्यात आली.
- २०१३मध्ये एनआयएने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यातील कलमे मागे घेऊन गैरकृत्ये प्रतिबंध कायद्यातील तरतुदी, कलमांनुसार ११ आरोपींविरोधात आरोपपत्र सादर केले होते.
-----------------
दोन आरोपींचा अद्याप शोध सुरूच
रामजी कलसंग्रा आणि संदीप डांगे या दोन आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे. बॉम्बस्फोट घडल्यापासून त्यांचा ठावठिकाणा देशभरातील पोलिस यंत्रणा लावू शकलेल्या नाहीत. या दोघांनी बॉम्ब पेरल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. दरम्यान, एटीएसच्या तपास पथकात सहभागी असलेले निलंबित पोलिस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी या दोघांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा २०१६मध्ये केला होता.
------
या आरोपींची सुटका
शिवनारायण कलसंग्रा, श्यामलाल साहू आणि प्रवीण मुतालिक यांना एनआयएच्या विनंतीवरून विशेष सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com