स्वयंसचित दरवाजांचा
प्रोटोटाइप कोच तयार

स्वयंसचित दरवाजांचा प्रोटोटाइप कोच तयार

Published on

स्वयंसचित दरवाजांचा
प्रोटोटाइप कोच तयार

अपघातांवर नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंब्रा येथे ९ जून रोजी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, केवळ ५० दिवसांत कुर्ला कारशेडमध्ये सामान्य लोकलसाठी ‘स्वयंचलित दरवाज्यांचा’ पहिला प्रोटोटाइप कोच तयार करण्यात आला आहे.

या कोचची पाहणी सोमवारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार करणार असल्याची शक्यता आहे. रेल्वेमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गर्दीमुळे दररोज १ ते २ प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडत आहेत. ठाणे-डोंबिवली मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढल्याने, रेल्वे बोर्डाने सर्वसामान्य लोकलमध्येही स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला.


---

प्रयोगाचे स्वरूप काय0

हा प्रोटोटाइप सिमेन्स प्रकारातील लोकलवर आधारित आहे. प्रवाशांना हवा खेळती राहावी यासाठी दरवाज्यांवर जाळीदार स्क्रीन बसवण्यात आली आहे. छतावरील वेंटिलेशन युनिट, वेस्टिब्यूल डिझाइन आणि दरवाज्यांच्या उघडझापीच्या यंत्रणेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. याचे अंतिम डिझाइन चैन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार आहे.
मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की“हा एक प्रायोगिक नमुना आहे. त्याला अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. एकाच कोचमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.”


---

पश्चिम रेल्वेचा अनुभव ठरला होता अपयशी

पश्चिम रेल्वेने डिसेंबर २०१९ मध्ये अशाच प्रकारचा प्रयोग केला होता. तीन कोचमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले होते, मात्र दरवाजे बंद राहिल्याने प्रवाशांना घुसमट होऊ लागली. उघडझापीच्या वेळेत होणाऱ्या अडथळ्यांमुळे हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही.


---

१५ डब्यांच्या लोकल्सची संख्या वाढणार

मध्य रेल्वेवर प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी डिसेंबर महिन्यापर्यंत १५ डब्यांच्या लोकल्सची संख्या वाढवण्याची योजना आहे.सध्या चालू असलेल्या २२ सेवांव्यतिरिक्त आणखी ४० ते ५० फेऱ्यांची भर पडणार आहे. प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढवण्यासाठी किमान ५ लोकल्सना १२ ऐवजी १५ डबे देण्यात येणार आहेत.


---

- स्वयंचलित दरवाजांमुळे अपेक्षित बदल

- अपघातांमध्ये लक्षणीय घट

- गर्दीच्या वेळी प्रवेश-निर्गम अधिक सुरक्षित

-प्रवासी सुरक्षेला नवा बळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com