चौथ्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण

चौथ्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण

Published on

चौथ्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण
पुढील फेरीत ‘ओपन टू ऑल’चे पर्याय

मुंबई, ता. २ : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील कॅप व कोटा प्रवेश अंतर्गत चौथ्या प्रवेश फेरीतील प्रवेश आज पूर्ण झाले. यात अखेरच्या दिवशी या फेरीत अलॉटमेंट झालेल्या ८३ हजार ९४४ विद्यार्थ्यांपैकी ७२ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी आज प्रवेश घेतले. यानंतर पाचव्या फेरीचे वेळापत्रक रविवारी (ता. ३) जाहीर केले जाणार आहे. यात ‘ओपन टू ऑल’चे पर्याय देण्यात येणार आहे. सर्व जागा या खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत.

खासगी कनिष्ठ महाविद्यालयांना या प्रवेशाचा मोठा लाभ होणार आहे. दुसरीकडे राखीव विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. चौथ्या प्रवेश फेरीसाठी दोन ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये कॅप फेरीसाठी एकूण ५४ हजार ८२८ इतके प्रवेश झालेले आहेत. तसेच कोटामध्ये (व्यवस्थापन कोटा, संस्थाअंतर्गत कोटा, अल्पसंख्यांक कोटा) १७ हजार ८१४ इतके असे एकूण ७२ हजार ६४२ विद्याथ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
या फेरीत मुंबई विभागात १७ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर ७ हजार १४० जणांनी कोटामधून असे एकूण २४ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी या फेरीत आपले प्रवेश घेतले आहेत. तर पुणे विभागातून कॅप मधून ८ हजार १०४ तसेच कोटामधून २ हजार ४२० अशा एकूण १० हजार ५२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
दरम्यान, आत्तापर्यंत इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी एकूण १४ लाख ३८ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली त्यापैकी आत्तापर्यंत आठ लाख ८४ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com