अतिधोकादायक ९६ इमारतींमधील भाडेकरूंचा असहकार
अतिधोकादायक ९६ इमारतींमधील भाडेकरूंचा असहकार
म्हाडाच्या नोटीसला ना उत्तर, ना पुरावे सादर; भाड्याबाबतही चर्चा नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने मुंबई शहरातील उपकरप्राप्त (सेस) इमारतींच्या केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ९६ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. त्यामध्ये जवळपास दोन हजार ४०० कुटुंबे वास्तव्यास असून, त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने म्हाडाने त्यांना नोटीस पाठवत इमारती रिकाम्या करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या घराची कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करणे, नोटीसला उत्तर देणे आवश्यक होते. तसेच संक्रमण सदनिकेसाठी किंवा भाड्यासाठी संपर्क साधने अपेक्षित होते, पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे.
म्हाडाच्या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील व भविष्यात अतिधोकादायक म्हणून घोषित होणाऱ्या इमारतींतील रहिवाशांना पर्यायी निवास व्यवस्था म्हणून देण्यासाठी पुरेशा संक्रमण सदनिका उपलब्ध नाहीत. त्यामुळे अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सदनिका रिकामी केल्यानंतर २० हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार म्हाडाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ९६ इमारती अतिधोकादायक ठरल्या आहेत. त्यामधील रहिवाशांना उपलब्ध संक्रमण सदनिका किंवा भाडे दिले जाणार आहे. त्यासाठी संबंधितांनी म्हाडाच्या वॉर्ड कार्यालयात घराचे पुरावे सादर करावेत, असे आवाहन म्हाडाने त्यांना नोटीस पाठवत केले होते. मात्र रहिवाशांकडून त्याबाबत कोणतीच पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे पुढे काय करावे, असा प्रश्न म्हाडासमोर उभा राहिला असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
म्हाडाला प्रतीक्षा प्रतिसादाची
अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी म्हाडाकडे पुरावे सादर करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्याकडून संक्रमण सदनिका हवी किंवा नको, २० हजार रुपये भाड्याबाबत काय भूमिका आहे, यावर कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संबंधित रहिवाशांनी नोटीसला प्रतिसाद दिल्यास पुढील समस्या सोडवता येतील किंवा कार्यवाही करणे शक्य होणार आहे.
हे पुरावे म्हाडाला द्यावे लागणार
- सदनिका भाड्याने घेतल्याचा करार
- भाडे पावती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.