गणेशोत्‍सवासाठी चाकरमान्यांकडून ५० टक्के बसेसचे आरक्षण

गणेशोत्‍सवासाठी चाकरमान्यांकडून ५० टक्के बसेसचे आरक्षण

Published on

गणेशोत्‍सवासाठी चाकरमान्यांकडून ५० टक्के बसचे आरक्षण
राजकीय पक्षांकडून एकाही बसचे आरक्षण नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : गणेशोत्सव हा मुंबईतील कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा उत्सव आहेत. श्री गणरायाचे बुधवारी (ता. २७) आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. शनिवार (ता. २३)पासून मुंबईतून गाड्या सुटणार आहेत; मात्र राजकीय पक्षांनी अद्याप एकाही बसचे आरक्षण केलेले नाही. आतापर्यंत प्रवाशांकडून ५० टक्के बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी ऐनवेळी बसची मागणी केल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे.
यंदा होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांसाठी राजकीय पक्षांकडून आतापर्यंत गाड्यांचे आरक्षण करणे आवश्यक होते. त्यानुसार एसटी महामंडळाला नियोजन करणे सोपे झाले असते; मात्र गाड्यांचे आरक्षण झालेले नाही. ऐनवेळी गाड्यांची मागणी केल्यास गाड्यांचा तुटवडा होऊ शकतो.
मुंबई विभागाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान १,८०० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंत ८६१ बस आरक्षित झाल्या आहेत, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या-तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते.
मुंबईतून यंदा सुमारे १,८०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यांवर धावतील. या बस आरक्षणासाठी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, या बसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या ॲपद्वारे उपलब्ध झाले आहेत. गट आरक्षण २२ जुलैपासून सुरू झाले असून २३ ऑगस्टपासून मुंबई विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी १,८०० हून बस सोडण्यात आल्या होत्या.
गणेशोत्‍सवासाठी कोकणात जाण्यासाठी तीन महिने आधी नियोजन असते. त्यानुसार प्रवासी गाड्यांचे तिकीट आरक्षण करतात; मात्र राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गाड्या सुटण्याच्या वेळी आपले बॅनर गाड्यांना लावून पक्षाने गाडी आरक्षित केल्याचे सांगतात. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडते, अशी प्रतिक्रिया गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली.

गतवर्षी प्रवाशांचे हाल
राजकीय पक्षांकडून गेल्यावर्षी ८७६ बसचे आरक्षण करण्यात करण्यात आले होते. एकीकडे संपामुळे प्रवाशांना गाड्यांचा तुटवडा होता, तर दुसरीकडे ऐनवेळी राजकीय पक्षांकडून १००हून अधिक गाड्या रद्द केल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते.

गणेशोत्सवासाठी राजकीय पक्षांकडून यापूर्वीच गाड्यांचे आरक्षण करणे अपेक्षित होते; परंतु आतापर्यंत एकाही गाडीचे आरक्षण करण्यात आले नाही. लवकरच गाड्यांचे आरक्षण केल्यास नियोजन करणे सोपे होते. राजकीय पक्षांना येत्या रविवार (ता. १०)पर्यंत गाड्यांचे आरक्षण करण्यास सांगितले आहे, असे एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

आगार बस आरक्षण
मुंबई सेंट्रल - २८०
परळ - ३२८
कुर्ला - २२७
उरण - २२
पनवेल - ४
एकूण - ८६१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com