अल्पवयीन तरुणीने रोखला मैत्रिणीचा बालविवाह
अल्पवयीन तरुणीने रोखला मैत्रिणीचा बालविवाह
क्राय संस्था, पोलिस, बालकल्याण समितीची कारवाई
मुंबई, ता. ५ : मानखुर्दच्या अण्णा भाऊ साठे नगरात राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीने योग्य वेळी दखल घेत आपल्या मैत्रिणीचा बालविवाह रोखला. बालविवाह अवैध असून गुन्हा आहे, ही जाणीव असलेल्या या तरुणीने क्राय संस्थेच्या किशोरी सभेत ही माहिती उघड करून मैत्रिणीचे आयुष्य सावरले. जुलै महिन्यात तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे क्राय संस्था, मानखुर्द पोलिस आणि बालकल्याण समितीने समन्वयाने कारवाई करीत बालविवाह रोखण्यात यश मिळवले.
क्राय संस्थेचे साठे नगरात केंद्र असून अभ्यासासाठी येणाऱ्या मुलांची दोन आठवड्यांनी येथे बालसभा आयोजित केली जाते. अशाच एका सभेत आपल्या समवयीन मैत्रिणीला तिचे वडील अचानक नाशिकला घेऊन गेल्याचे तसेच वडिलांनी तिचे लग्न ठरवल्याचे केंद्रातील अधिकाऱ्यांना या तरुणीने सांगितले. या माहितीवरून क्राय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्या मुलीचे घर गाठले. तेथे तिची आजी आणि काका होते. त्यांच्यासह शेजाऱ्यांनीही या मुलीला कोठे, कशासाठी नेण्यात आले याबाबत माहिती दिली नाही. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी चाइल्ड हेल्पलाइन (१०९८), मानखुर्द पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मधू घोरपडे यांच्याशी संपर्क साधला. तांत्रिकदृष्ट्या मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी आणि तिचे वडील नाशिक येथे असून दुसऱ्याच दिवशी या मुलीचा विवाह होणार आहे, अशी गोपनीय माहिती पोलिस, क्राय यांना मिळाली. पोलिसांच्या कारवाईआधीच मुलीच्या आजीने प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याचा निरोप आपल्या मुलापर्यंत (अल्पवयीन मुलीचे वडील) पोहोचवला. पोलिस कारवाईच्या भीतीने मुलीला घेऊन तिचे वडील साठे नगरात परतले. तोपर्यंत त्यांनी अल्पवयीन मुलीचा विवाह रद्द केला नव्हता. मैत्रिणीच्या बालविवाहाची माहिती देणाऱ्या मुलीने आपल्या मैत्रिणीचे लग्न नाशिक येथील २० वर्षांच्या तरुणासोबत निश्चित झाल्याचे पुन्हा अधिकाऱ्यांना सांगितले.
...
वडिलांना समज
क्रायच्या माहितीच्या आधारे मानखुर्द पोलिसांनी चौकशीसाठी दाेघांना बोलावले असता, वडिलांच्या मोबाइलमध्ये या बालविवाहाच्या आमंत्रण पत्रिका तसेच नातेवाइकांना आमंत्रित करणारे लघुसंदेश आढळले. वडिलांना पोलिसांनी समज देऊन १८ वर्षं पूर्ण होईपर्यंत मुलीचे लग्न न करण्याचे पोलिसांनी लिहून घेतले. बाल समितीने मुलीचे समुपदेशन करून ती आपले शिक्षण पूर्ण करेल, या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एक महिन्याने परिस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचनाही केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.