अवयवदानात महाराष्ट्र अग्रेसर राष्ट्रीय पातळीवर राज्याला सातत्याने यश
अवयवदानात महाराष्ट्र अग्रेसर
राष्ट्रीय पातळीवर राज्याला सातत्याने यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महाराष्ट्र राज्य अवयवदानात सातत्याने प्रगती करत देशात अग्रेसर ठरले आहे. अवयवदानासाठी प्रशिक्षण, जनजागृती आणि धोरणात्मक पावले राज्याने उचलली आहेत. यामुळे राज्याला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १५व्या राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त केईएम रुग्णालयात मंगळवारी (ता. ५) झालेल्या कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली.
राज्यात १,००० हून अधिक ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले असून अवयवदान करणाऱ्यांच्या सन्मानार्थ केईएममध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. ‘रोटो सोटो’चे संचालक डॉ. आकाश शुक्ला यांनी मृतावस्थेतील अवयव संकलनासाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर तसेच ऊतक व त्वचेची साठवणूक करणाऱ्या ऊतक बँकेविषयी माहिती दिली. मागील पाच वर्षांत राज्यात १,२०० हून अधिक माहिती व विविध उपक्रम राबवण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अवयवदान मॉडेलचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी अवयवदान ही आयुष्यदानाची संधी असून, ही मोहीम वर्षभर सुरूच ठेवायला हवी, असे अधिष्ठाता डॉ. संगीता रावत म्हणाल्या.
..............
महाराष्ट्राचे पुरस्कार
२०१७ ते २०२२ या काळात महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य, सर्वोत्तम सोटो आणि प्रोटो अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
.................
अवयवदानात वाढ
कोविडच्या काळात घटलेली अवयवदान प्रकरणे आता वाढू लागली असून, २०२५च्या मध्यातच मागील वर्षाच्या तुलनेत ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रोटो सोटो यंत्रणेमार्फत नोंदणी, वाटप आणि प्रचारासाठी समन्वय साधण्यात येत आहे.
...................
ही केवळ मोहीम नसून सामाजिक जबाबदारी आहे. लोकांच्या मनातील भीती दूर करून ही चळवळ व्यापक करू, अवयवदानासंदर्भातील नियम अधिक सुलभ करण्यात येणार असून रुग्णालयांना अडचणींपासून सवलती दिल्या जातील.
- प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.