प्रभारी अधिकारी व अतिरिक्त कार्यभार मुळे एसटीचे व्यवस्थापन विस्कळीत
एसटीचा रोजचा तोटा चार कोटी
उपाययोजना करूनही फरक पडेना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : प्रभारी अधिकारी व अतिरिक्त कार्यभारामुळे एसटीचे व्यवस्थापन विस्कळित झाले आहे. दैनंदिन उत्पन्न ३२ कोटी रुपये मिळाले, तरच एसटी आपला महिन्याचा खर्च भागू शकते; मात्र सध्या दररोज सरासरी २८ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. एसटीचा दैनंदिन तोटा तीन कोटींवरून चार कोटींवर गेला आहे.
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यांतील प्रवासीवर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. दोन वर्षे कोरोना महामारी आणि त्यापाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. एप्रिल ते जुलै २०२४मध्ये एप्रिल ते जुलै २०२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३१ कोटी रुपयांनी तोटा कमी झाला होता. पाच ते सहा वर्षे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र हा तोटा कमी होण्याऐवजी त्यामध्ये आणखी एक कोटीची भर पडली आहे.
एसटी प्रशासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्षे तोट्यामध्ये आहेत त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर विविध उपाययोजना करण्यात आल्या; परंतु एसटीच्या उत्पन्नात त्याचा फरक दिसून आला नाही.
...
५ ऑगस्टचे उत्पन्न
प्रदेश - अपेक्षित उत्पन्न (कोटींत) - मिळालेले उत्पन्न (कोटींत)
नाशिक ------------------ ६.१ ------------------ ५.२६
छ. संभाजीनगर ------------------ ७ ------------------ ५. ९४
पुणे ------------------ ७. ९५ ------------------ ६. ६७
मुंबई ------------------ ४. ६२ ------------------ ३. ८४
अमरावती ------------------ ३. ४८ ------------------ २. ८४
नागपूर ------------------ ३. १५ ------------------ २. ४४
...
एसटी महामंडळाचा तोटा वाढत आहे. त्यामुळे केवळ तिकीट उत्पन्नावर अवलंबून न राहता पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर भर आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.