पाण्याची चिंता मिटली
पाण्याची चिंता मिटली
तलावांतील पाणीसाठा ८९ टक्क्यांवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, दि. ७ : शहराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तलावांमध्ये साचला असून, पाण्याचा तुटवडा भासणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या तब्बल १२,९०,८१७ एमएलडी (८९.१८ टक्के) पाणीसाठा आहे. एकूण क्षमता १४,४७,३६३ एमएलडी असलेल्या तलावा परिसरामध्ये अद्याप पावसाळा सुरूच आहे. त्यामुळे हा साठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईला दररोज सुमारे ३,९०० एमएलडी पाण्याची गरज असते. त्यामुळे सध्याचा साठा सुमारे ३३१ दिवस म्हणजे १० महिने २६ दिवस पुरेल. मे २०२६ पर्यंत हा साठा पुरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे मुंबईला पुढील पावसाळा येईपर्यंत पाणीटंचाईचा धोका नाही.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव अपर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यामधील बहुतेक तलाव आता ८५ टक्क्यांहून अधिक भरलेले आहेत. मोडक सागर ९९.९९ टक्के भरून जवळपास पूर्ण क्षमतेला गेला आहे. त्याचप्रमाणे तानसा, मध्य वैतरणा, भातसा यांचाही साठा समाधानकारक आहे.
या घडीला फक्त विहार तलावामध्ये अपेक्षेप्रमाणे साठा नाही, मात्र एकूण सात तलावांचा मिळून असलेला साठा पाहता मुंबईकरांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, हे निश्चित. प्रशासन आणि जल प्राधिकरणाने आवश्यक नियोजन ठेवले, तर हा साठा अधिक कार्यक्षमतेने वापरता येणार आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्षानुसार पाणीसाठा
(८ ऑगस्टपर्यंत) :
२०२५ – १२,९०,८१७ एमएलडी
२०२४ – १३,०५,९४८ एमएलडी
२०२३ – ११,७२,९६७ एमएलडी
तलावनिहाय साठा
भातसा – ६,२०,७४४ एमएलडी (८६.५७ टक्के)
अपर वैतरणा – १,८७,९०५ एमएलडी (८२.७६ टक्के)
मोडक सागर – १,२८,९१० एमएलडी (९९.९९ टक्के)
तानसा – १,४२,७६९ एमएलडी (९८.४१ टक्के)
मध्य वैतरणा – १,८३,३८१ एमएलडी (९४.७६ टक्के)
विहार – २०,२९८ एमएलडी (२३.२८ टक्के)
तुळशी – ६,८१० एमएलडी (८४.६४ टक्के)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.