मुंबईकरांना हॉर्निंगचा मोह आवरेना
मुंबईकरांना हॉर्नचा मोह आवरेना
वाहतूक पोलिसांची २१,४९२ चालकांवर कारवाई
मुंबई : अनावश्यक हॉर्न वाजवल्यामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो; मात्र मुंबईकरांना हॉर्नचा मोह आवरत नाही. गेल्यावर्षी वाहतूक पोलिसांनी २१,४९२ चालकांवर कारवाई केली आहे.
वाहनांना चित्रविचित्र, कर्णकर्कश व प्रेशर हॉर्न लावले जातात. काहीजण वाहनांशी छेडछाड करून हॉर्नचा आवाज वाढवितात आणि रस्त्यावर गोंगाट करीत फिरत असतात. चौकात सिग्नल हिरवा होण्याआधीच मागचे वाहनचालक हॉर्नचा गोंगाट करतात, जणू ते वाजविले की रस्ता साफ होईल. तर चौकात, वळणावर गाडीचा वेग कमी करण्याऐवजी हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करून लोकांच्या कानठळ्या बसवतात.
ध्वनी प्रदूषणामुळे कानातील पेशींना इजा होऊन बहिरेपणा येऊ शकतो. याशिवाय चिडचिडेपणा, कामाची कार्यक्षमता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, रक्तदाब, हृदयविकार व निद्रानाश यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. मुलांवर दुष्परिणाम होत आहेत व अपघातही वाढले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रेशर हॉर्न, पॉवर हॉर्न व म्युझिकल हॉर्नवर बंदी घातली असूनही त्याचा सर्रासपणे वापर होत असल्याचे चित्र आहे.
===
नो हॉकिंग सर्वाधिक चलन
जोगेश्वरी - २,५५८
समतानगर - १,९४०
नागपाडा - १,६१२
भायखळा - १,५९०
दादर - ८३७
==
नो हॉकिंग कमी चलन
बीकेसी - १०५
मरीन ड्राइव्ह - १०८
विक्रोळी - १४४
माटुंगा - १४८
घाटकोपर/गोरेगाव - १७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.