मुंबईकरांची आलिशान गाड्यांना पसंती
मुंबईकरांची आलिशान गाड्यांना पसंती
महागड्या ९९४ चारचाकींची आयात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : फेरारी, लॅम्बोर्गिनी, मिनी कुप्पर, जॅग्वार यांसारख्या आलिशान कार, तर डुकाटी मॉन्स्टर, स्क्रॅम्बलरसारख्या दुचाकींच्या प्रेमात श्रीमंत मुंबईकर पडले आहेत. मुंबईकरांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये (जुलैपर्यंत) महागड्या व आलिशान ९९४ गाड्यांची खरेदी केली आहे.
मुंबईकरांनी खरेदी केलेल्या या गाड्यांची किंमत एक ते पाच कोटींहून अधिक असून, ताडदेव आरटीओमध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. महागड्या गाड्यांमध्ये जास्त ‘बीएमडब्ल्यू’ या कंपनीच्या कारचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत कोविडनंतर नागरिकांची आर्थिक गाडी हळूहळू रुळावर आली. त्यानंतर गेल्या काही दिवसांत महागड्या गाड्या आयात करण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरातच कोट्यवधी किमतीच्या गाड्या खरेदी केल्या गेल्या आहेत. या गाड्या इलेक्ट्रिक, सीएनजी, पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनावर धावणाऱ्या आहेत. एकीकडे प्रतिष्ठा आणि आरामदायी प्रवासासाठी या गाड्यांची खरेदी वाढली आहे. त्यातच या गाड्यांचा दुरुस्ती खर्चही अधिक आहे.
===
कोणत्या गाड्यांना पसंती
ऑडी
लॅम्बोर्गिनी
बेन्टली
बीएमडब्ल्यू
फेरारी
जॅग्वार
मर्सिडीज
पोर्श
रोल्स रॉयस
---
वाहनांची आकडेवारी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये (जुलैपर्यंत)
आरटीओ - वाहने
ताडदेव - ५५२
अंधेरी - १७१
वडाळा - १४९
बोरिवली - १२२
एकूण ९९४
===
२० टक्के नोंदणी शुल्क
आयात करण्यात आलेल्या वाहनावर २० टक्के नोंदणी शुल्क आकारण्यात येतो. गेल्या वर्षी ९९४ वाहनांची नोंदणी झाली असून, त्याद्वारे कोट्यवधी रुपयांचा महसूल परिवहन विभागाला मिळाला आहे.
=======
हौसेला मोल नसते
गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी या वाहनांत भर पडत आहे. केवळ कोट्यवधी चारचाकी नव्हे, तर महागड्या दुचाकीही मुंबईतील रस्त्यावर धावत आहेत. हौसेला मोल नसते, असे म्हणतात. त्यात मुंबईकरांच्या हौसेला तर उधाण येत असल्याचे वाहन नोंदणीवरून दिसून येत आहे.
==
प्रतिष्ठा दाखविण्यासाठी महागड्या गाड्यांची खरेदी केली जाते. तसेच मुंबईकरांची आर्थिक क्षमता वाढली आहे. मुंबईतील काही रस्ते खराब आहेत; परंतु या गाड्यांची रचना चांगली असल्याने आरामदायी प्रवास करता येतो. तसेच या गाड्या खरेदीसाठी कर्जही उपलब्ध आहे. त्यामुळे गाड्यांची खरेदी वाढली आहे.
- डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.