मुंबईकरांचे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष
मुंबईकरांचे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष
चार महिन्यांत १२.२३ कोटींची दंडवसुली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या घटनादेखील वाढत आहेत. मुंबईतील चारही परिवहन कार्यालयाने चार महिन्यांत केलेल्या कारवाईत तब्बल २६ हजार ६१८ वाहनचालकांकडून सुमारे १२.२३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबईतील ताडदेव, अंधेरी, वडाळा आणि बोरिवली आरटीओ कार्यालयांतील वायुवेग पथकांनी तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. गेल्या चार महिन्यांत ८४ हजारांहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील २६ हजारांहून अधिक दोषी वाहनचालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १२.२३ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्यासाठी वायुवेग पथकाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. कारवाईबरोबरच जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला. त्यामुळे अपघातांचे प्रमाण घटत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
---
कारवाई का झाली?
लायसन्स नसणे
विनाहेल्मेट वाहन चालवणे
सीटबेल्टचा वापर न करणे
वेगमर्यादेचे उल्लंघन करणे
अवैध प्रवासी वाहतूक
प्रवासी वाहनातून मालवाहतूक
क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक
---
आरटीओनिहाय कारवाई
आरटीओ तपासलेली वाहने दोषी वाहने दंडवसुली (कोटींत)
ताडदेव १५,५६० ५,०५२ ३.४५
अंधेरी १३,५९८ ४,८०५ ३.५९
वडाळा ४४,२०० १३,४०० ३.६६
बोरिवली ११,१८४ ३,३६१ १.५०
एकूण ८४,५४२ २६,६१८ १२.२३
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.