जेम ॲरोमॅटिक्स आयपीओचा किंमतपट्टा निश्चित

जेम ॲरोमॅटिक्स आयपीओचा किंमतपट्टा निश्चित

Published on

जेम ॲरोमॅटिक्स आयपीओचा किंमतपट्टा निश्चित
मुंबई, ता. १३ : विविध प्रकारची सुगंधी रसायने तेले आणि द्रव्य बनवणारी कंपनी जेम ॲरोमॅटिक्स लि.च्या आयपीओसाठी ३०९ ते ३२५ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
या आयपीओमध्ये १९ ते २१ ऑगस्टदरम्यान गुंतवणूक करता येईल. यात किमान ३६ शेअरसाठी व त्यापुढे ४६ शेअरच्या पटीतच गुंतवणूक करावी लागेल. वेगवेगळी तेले, सुगंधी द्रव्ये, त्यांच्यासाठी लागणारी रसायने बनवण्यात कंपनीचा गेली २० वर्षे हातखंडा आहे. मौखिक आरोग्य, सौंदर्यप्रसाधने, पोषक द्रव्ये, औषधी द्रव्ये, आरोग्य, वैयक्तिक निगा, वेदनाशमक औषधे या क्षेत्रासाठी लागणारी रसायने कंपनी बनवते.
डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडतर्फे कंपनीला थ्री स्टार एक्सपोर्ट हाउसचा दर्जा देण्यात आला आहे. कोलगेट पामोलीव्ह, डाबर, पतंजली, रोझारी बायोटेक, सिमराईस प्रायव्हेट अशा अनेक देशी आणि परदेशी कंपन्या जेम ॲरोमॅटिकचे ग्राहक आहेत. त्यांचे देशी ग्राहक २२५ असून, १८ देशांमध्ये त्यांचे ४४ परदेशी ग्राहक आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ५०३ कोटी रुपये होता. मागील वर्षीपेक्षा त्यात ११.३८ टक्क्यांची वाढ झाली. तर त्याच वर्षातील त्यांचा नफा मागील वर्षीपेक्षा साडेसहा टक्के वाढून ५३.३८ कोटी रुपये झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com