टाटा पॉवरचे ''घरघर सोलर''

टाटा पॉवरचे ''घरघर सोलर''

Published on

टाटा पॉवरचे ‘घरघर सोलर’
घराच्या छतावर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी विशेष योजना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : हरितऊर्जा अशी ओळख असलेल्या सौरऊर्जा वापराला चालना मिळण्यासाठी टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल्सने घरघर सोलर ही विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यभरात ही मोहीम राबवली जाणार असून, त्याची सुरुवात पुण्यात करण्यात आली आहे. निवासी घरांवर सौरऊर्जा प्रणालींचा वापर वाढवणे आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
नव्या योजनेत ग्राहकांना फक्त १,९४७ रुपये भरून छतावरील सौर प्रणाली घेता येईल. ही रक्कम भारताच्या स्वातंत्र्य वर्षाचे प्रतीक असून, ग्राहकांची वाढीव वीजबिलापासून सुटका होऊ शकते. त्यामुळे सामान्य वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे, तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना मिळू शकणार आहे. या मोहिमेत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी १८००२५७७७७७ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीने केले आहे.

- या सौर प्रणालीच्या किमतीसाठी जवळपास १०० टक्के कर्जसुविधा उपलब्ध
- दोन किलोवॉट क्षमतेच्या प्रणालीसाठी २,३६९ रुपयांपासून मासिक हप्ते, ६० महिन्यांपर्यंतचा सोयीस्कर कर्जकालावधी आणि जलद प्रक्रियेसाठी त्वरित डिजिटल कर्जमंजुरीची सुविधा
- ‘टाटा पॉवर सोलारूफ’च्या सर्व निवासी ग्राहकांना ‘टाटा एआयजी’ कंपनीकडून एक वर्षाची मोफत सौर विमा सुविधा

कर्ज सुविधा
ग्राहकांनी सौरऊर्जेचा स्वीकार जास्तीत जास्त करावा यासाठी ‘टाटा पॉवर सोलारूफ’ने एसबीआय, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक यांसह १५ आघाडीच्या वित्तीय संस्थांशी भागीदारी केली असून, निवासी ग्राहकांसाठी सुलभ कर्जसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

८०० मेगावॉटचे लक्ष
‘टाटा पॉवर सोलारूफ’ने महाराष्ट्रात जुलै २०२५पर्यंत एकूण ७७५ मेगावॉट इतक्या क्षमतेच्या निवासी छतांवर सौरऊर्जा यंत्रणा बसविल्या असून, याचा लाभ २७,९१० ग्राहकांना मिळाला आहे. पुढील तीन वर्षांत आणखी ८०० मेगावॉट क्षमतेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुण्यात आधीच २०० मेगावॉट क्षमतेसह भक्कम उपस्थिती असलेल्या कंपनीने त्याच कालावधीत आणखी २५० मेगावॉट क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com