मुलुंड परिसरात गुरुवारपासून १८ तास पाणीपुरवठा खंडित
मुलुंड परिसरात गुरुवारपासून १८ तास पाणीपुरवठा खंडित
जीएमएलआर पुलाच्या कामासाठी जलवाहिनी वळवणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यावरील (जीएमएलआर) पुलाच्या कामामुळे बाधित होणारी १,२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम महापालिका हाती घेणार आहे. त्यामुळे टी विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १८ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.
हे काम गुरुवारी (ता. २१) सकाळी १० वाजता सुरू होऊन शुक्रवारी (ता. २२) पहाटे चार वाजेपर्यंत सुरू राहील. यादरम्यान मॅरेथॉन मॅक्सिमा इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगतचा भाग आणि आसपासचे परिसर जलपुरवठ्यापासून वंचित राहतील. महापालिकेने संबंधित परिसरातील नागरिकांना आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवण्याचे, पाणी काटकसरीने वापरण्याचे तसेच पुढील चार ते पाच दिवस पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे.
पाणीपुरवठा खंडित होणारे प्रमुख परिसर
मुलुंड (पश्चिम), एलबीएस रस्त्यालगतचा परिसर, जेएन मार्ग, देवीदयाल मार्ग, डम्पिंग ग्राउंड मार्ग, डॉ. आर.पी. मार्ग, पीके मार्ग, झवेर मार्ग, एमजी रोड, एनएस मार्ग, एसएन मार्ग, आरएचबी मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्हीपी मार्ग, मदनमोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बीआर मार्ग, गोशाळा मार्ग, एसएल मार्ग, नाहुर गाव आदी भागांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.