कर्णकर्कश सायलेन्सरचे वेड महागात

कर्णकर्कश सायलेन्सरचे वेड महागात

Published on

कर्णकर्कश सायलेन्सरचे वेड महागात
मुंबईत चार हजार जणांना ई-चलानचा फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येऊनही काही हौशी वाहनधारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरले जात आहेत. इतकेच काय तर दुचाकी वेड्यावाकड्या चालवल्या जात आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांच्या २०२४च्या अहवालानुसार अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत चार हजार १८९ जणांना ई-चलान आकारण्यात आले आहे.

कर्णकर्कश आवाज करीत सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या कारवाई करण्यात आलेल्या वाहनांचे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले. संबंधित वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाईही केली. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या लाखोंच्या फटाका सायलेन्सरवर पोलिसांनी थेट रोलर फिरवत ते नष्ट केले; मात्र पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही काही हौशी वाहनधारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाच्या सायलेन्सरचा वापर केला जातो. तसेच दुचाकी चालवताना स्टंटबाजी केली जाते. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघातही घडले आहेत. सण-उत्सव काळात काढण्यात येणाऱ्या दुचाकी रॅलीत अशा फटाका सायलेन्सर असलेल्या दुचाकींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे आढळून आले आहे.
==
काय होते कारवाई?
फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दंड न भरल्‍यास त्यांच्याविरोधात थेट न्यायालयातून नोटीस काढली जाते. फटाका सायलेन्सर वापरल्‍यास गुन्हाही दाखल केला जातो. मोटार वाहन कायदा १९८ अंतर्गत अनधिकृतपणे वाहनात बदल केल्यामुळे एक हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे.
==
विभागनिहाय कारवाई
विभाग - ई-चलान
वाकोला - ५८२
कांदिवली - ३९१
भोईवाडा - १९१
साकीनाका - १८९
बोरिवली - १८१
===
आवाजाचा गोंगाट करणाऱ्यांना ४१ लाखांचा दंड
मुंबईत वाहनधारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरण्यात आले. त्यांच्यावर ई-चलानची कारवाई करण्यात आली आहे. ४,१८९ जणांना ई-चलान आकारण्यात आले आहे. त्यांना ४१,८९,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
==

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com