‘चिंतामणी’चा आगमन सोहळा जल्लोषात!
‘चिंतामणी’चा आगमन सोहळा जल्लोषात!
तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर आज चिंचपोकळीचा ‘चिंतामणी’ भव्य मिरवणुकीतून आपल्या भक्तांच्या भेटीस आला. १०६ वर्षांच्या परंपरेचा वारसा जपत या गणरायाचे आगमन झाले. या मिरवणुकीला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
परळ येथील प्रसिद्ध कलाकंद कार्यशाळेत चिंतामणीची मूर्ती घडवण्यात आली. सकाळी ११ वाजता मिरवणुकीची सुरुवात होणार होती; मात्र सकाळी १० वाजल्यापासूनच भक्तगण मोठ्या संख्येने जमा होऊ लागले. त्यामुळे या परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यशाळेपासून जवळपास एक किलोमीटरपर्यंत सामान्यांना प्रवेशबंदी होती. खबरदारी म्हणून दंगल नियंत्रण बल आणि शीघ्र कृती दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या.
चिंतामणीची मिरवणूक दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झाली. ढोल-ताशे, लेझीम या पारंपरिक वाद्यांच्या निनादात दादर ते चिंचपोकळी अशी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग पूर्णपणे बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. तब्बल पाच तास चाललेल्या जल्लोषानंतर सायंकाळी साडेपाच वाजता चिंचपोकळीच्या आपल्या दरबारात बाप्पाचे आगमन झाले.
...
१७०हून अधिक गणेशमूर्तींचे आगमन
गणेश चतुर्थीपूर्वीचा आजचा शेवटचा रविवार असल्याने मुंबईतील अनेक मोठ्या सार्वजनिक मंडळांचे बाप्पा आज मिरवणुकीतून आले. लालबाग-परळ कार्यशाळांतून १७०हून अधिक गणेशमूर्तींचे आगमन झाले. चिंचपोकळीच्या चिंतामणीसोबतच उमरखेडचा राजा, परळचा राजा, धारावीचा वरदविनायक यांच्याही मिरवणुका आज जल्लोषात पार पडल्या.
...
परिसर गणेशमय
मुंबईकरांसाठी आजचा दिवस वेगळाच ठरला. बाप्पाच्या मिरवणुकीचा आनंद, पारंपरिक वाद्यांचा गजर यामुळे लालबाग- परळ- चिंचपोकळी परिसर पूर्णपणे गणेशमय झाला होता. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.