आयआयटी मुंबईत सूक्ष्मजंतूवर प्रयोग

आयआयटी मुंबईत सूक्ष्मजंतूवर प्रयोग

Published on

आयआयटी मुंबईत सूक्ष्म जंतूंवर प्रयोग
मानवी उत्क्रांतीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न

मुंबई, ता. १८ : आयआयटी मुंबईतील रसायन अभियांत्रिकी विभागातील संशोधकांनी सूक्ष्म जीवांच्या विश्वात घडणाऱ्या प्रक्रिया समजून घेऊन मानवी उत्क्रांतीचे रहस्य उकलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी सूक्ष्म जंतूंवर प्रयोग करून या प्रयत्नांसाठीचा एक अभ्यास केला आहे.

संशोधकांनी मानवी उत्क्रांतीमध्ये एकसारख्या वातावरणातील अगदी सूक्ष्म भिन्न प्रजातींना उत्क्रांतीच्या भिन्न मार्गावर नेऊ शकते, असे दाखवणारा हा पहिला अभ्यास आहे. संशोधकांनी या प्रयोगांसाठी एका गटातील सूक्ष्म जंतूंना ग्लुकोज आणि गॅलेक्टोज (दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी शर्करा) यांचे मिश्रण दिले. इतर गटांना त्यांनी त्याच ग्लुकोज आणि गॅलेक्टोजपासून बनलेल्या जटिल शर्करा (कॉम्प्लेक्स शुगर्स) मेलीबायोस किंवा लॅक्टोज दिले. अनेक पिढ्यांनंतर अन्नातील सूक्ष्म फरकांमुळे उत्क्रांतीच्या मार्गाला फाटे फुटत जातात. ३०० पिढ्यांनंतर जिवाणूंच्या एका गटामध्ये त्यांची संख्या वाढण्याचा वेग वाढलेला दिसून आला, तर दुसऱ्या गटामध्ये जीव वस्तुमान (बायोमास; एकूण वजन) जास्त दिसून आले. अशा प्रकारे त्यांच्या वाढीमध्ये दोन भिन्न वैशिष्ट्ये आढळली. यीस्टच्या गटांमध्येही असेच भिन्न परिणाम दिसून आले. साखरेच्या रचनेनुसार सूक्ष्म जंतूंचा प्रत्येक गट अन्नातील फरकांशी जुळवून घेत उत्क्रांतीच्या दोन अशा मार्गांवर अनुकूलन करीत जातो, ज्यांचे पूर्वानुमान लावता येत नाही. अनेक उत्परिवर्तनांमुळे हे अनुकूलन झाले, असे जनुकीय अभ्यासात दिसून आल्याचे संशोधक गटाचे म्हणणे आहे.

उत्क्रांतीची प्रक्रिया परिवर्तनशील आहे आणि त्याला मर्यादा पण आहेत, याची आठवण या निरीक्षणामुळे होते. समान वातावरणात सूक्ष्म जीवांच्या वर्तनात काय बदल होतील याचा अंदाज वर्तविता येणे शक्य नव्हते. उत्क्रांतीमधील संभाव्य परिवर्तनशीलतेचे हे उदाहरण आहे. तरीही त्या उत्क्रांतीचे नवीन वातावरणामध्ये दिसून येणारे प्लेओट्रॉपिक परिणाम आश्चर्यकारकपणे सुसंगत होते. विकसित झालेले जीव एखाद्या वेगळ्या वातावरणात कशी कामगिरी करतील ते त्यांच्या पूर्वजांचे वर्तन कसे होते, या आधारावर भाकीत केले जाऊ शकते.
- पवित्रा वेंकटरामन, माजी पीएचडी विद्यार्थिनी, आयआयटी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com