मुंबई
बेस्टकडून अतिरिक्त बससेवा
बेस्टकडून अतिरिक्त बससेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : रेल्वेसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टकडून अतिरिक्त बससेवा सोडण्यात आल्या. कुर्ला स्थानक (पूर्व) येथून सीएसएमटीकडे फ्री-वेमार्गे ए-२६वर दोन बस, आणिक डेपो व महापालिका चौकाकडे प्रत्येकी एक बस सोडण्यात आली. वाशी रेल्वे स्थानकावरून आणिक डेपोमार्गे ५०१ मार्गावर सात बस, तर सीएसएमटीकडे फ्री-वेमार्गे ए-५वर चार बस आणि सायनकडे पाच बस सोडण्यात आल्या.
मुलुंड डेपोतून अमर महल, सायनकडे ३६८ मार्गावरील चार बसेस, खारीगावकडे ४९४ मार्गावर एक बस सोडण्यात आली. याशिवाय वडाळा डेपोमधून रेतीबंदर, महापालिका चौक व इतर ठिकाणी बससेवा पुरवण्यात आल्या. रेल्वेसेवा पुन्हा सुरळीत होईपर्यंत ही अतिरिक्त बससेवा सुरू राहणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.