संपूर्ण मुंबई नजरेच्या टप्प्यात
मुंबईच्या सुरक्षेसाठी दहा हजार ‘डाेळे’
अतिवृष्टीत आपत्कालीन यंत्रणेला मदत; प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : शहरात अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली असताना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा तिसरा डाेळा अख्ख्या मुंबईवर नजर राेखून हाेता. कुठे पाणी भरले आहे, दरड काेसळली, झाड पडले किंवा कुठे वाहतूक काेंडी आहे, याचे इत्थंभूत चित्रण दहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत क्षणाक्षणाला केले जात हाेते. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा तत्काळ नागरिकांच्या मदतीला धावून जाणे शक्य झाल्याने माेठ्या प्रमाणावर जीवितहानी टाळता आल्याचे दिसून आले.
मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबईत घडणारा प्रत्येक क्षण टिपत होता. या कक्षात १८ ते २० कर्मचारी प्रत्येक पाळीत कार्यरत हाेते. पालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्ष मुंबई प्रत्येक प्रभागातील आपत्कालीन विभागाशी समन्वय ठेवून हाेता. दोन दिवस या विभागात सतत फोन खणखणत होते. त्यानुसार संबंधित विभागाला क्षणाेक्षणी सतर्क केले जात होते. पालिका आयुक्त भूषण गगराणी हे स्वत: आपत्कालीन विभागात दोन दिवस ठाण मांडून होते. अतिवृष्टीच्या काळात मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून महत्त्वाच्या ठिकाणी समन्वय ठेवला जातो. पालकमंत्री, राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, राज्य आपत्ती आणीबाणी कृती केंद्र यांच्याशी संपर्क ठेवण्यात आला हाेता. त्यामुळे पुढचे नियाेजन साेपे झाल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
कसे ठेवले लक्ष?
मुंबई शहर संनियंत्रण प्रकल्पांत राज्य सरकार आणि मुंबई पोलिस यांच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरांत १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यातील प्रत्येक क्षण पालिका मुख्यालयात असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात असलेल्या मोठ्या स्क्रीनवर दिसताे. मंत्रालय, वाहतूक पोलिस, मुंबईचे पोलिस आयुक्त, वरळी ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी नियंत्रण कक्षात ही सुविधा देण्यात आली आहे.
....
डिजिटल मोबाइल रेडिओची सुविधा
पालिकेचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक झाला आहे. पूर्वी वायरलेस सेट असायचा. ही सुविधा अनेकांकडे होती, त्यामुळे गोंधळ उडायचा. आता नव्याने व्हीएचएफ ॲडव्हान्स डिजिटल मोबाइल सुविधा दिल्यामुळे संदेश मिळणे सोपे झाले आहे. त्यांना फक्त आठ ठिकाणी जाेडणी दिली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत काम सोपे झाले आहे.
----
‘मिठी’ला धोक्याचा इशारा
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर आल्याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले. त्यामुळे एनडीआरएफने लोकांना लगतच्या शाळेत स्थलांतर केले. तातडीने संदेशवहन यंत्रणेमुळे लोकांना तत्काळ मदत मिळाली.
----
२४ विभागांत ३६५ दिवस कार्यरत
पालिकेच्या २४ विभागांत आपत्कालीन यंत्रणा ३६५ दिवस कार्यरत असतो. त्यामुळे पालिका कोणत्याही आपत्तीसाठी सतर्क असल्याची माहिती आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
-----
या यंत्रणांशी समन्वय
नाैदल, सैन्यदल, एनडीआरएफ, मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस, रुग्णालये, अग्निशमन, शिक्षण विभाग, बेस्ट, बीएसएफ या यंत्रणांशी समन्वय ठेवण्यात येतो. कुठेही मोठी आपत्ती घडल्यास तेथे या पथकांची मदत होते.
‘एनडीआरएफ’ची माेठी मदत
पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी एक पथक तैनात करण्यात आले आहे. ते पथक कुर्ला आणि घाटकोपर येथे, तर शहरासाठी नाना चौक येथील डी विभाग कार्यालयाजवळ हे पथक तैनात आहे. ही पथके आपत्कालीन विभागाशी समन्वय ठेवून असतात. आपत्तीच्या काळात या पथकाची मोठी मदत झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.