मुंबई
माजी आयुक्त अनिल पवार न्यायालयीन कोठडीत
माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना न्यायालयीन कोठडी
मुंबई, ता. २० : वसई-विरार महापालिका हद्दीतील अवैध बांधकाम घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने अटक केलेल्या माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना बुधवारी (ता. २०) विशेष सत्र न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ईडीने पवार यांच्यासह तत्कालीन उपसंचालक (नगररचना) वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता यांना बुधवारी (ता. १३) अटक केली होती. न्यायालयाने त्यांना बुधवारी (ता. २०)पर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले गेले.
आरोपी सनदी अधिकारी, लोकप्रतिनिधी आहेत. ते या प्रकरणातील पुरावे नष्ट करू शकतात, साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, अशी शक्यता ईडीकडून न्यायालयात वर्तविण्यात आली.