
तासाला पाच जण डेंगी-मलेरियाचे शिकार
राज्यात जुलैपर्यंत १७ हजार २८१ लोकांना लागण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात दर तासाला पाच, तर दरदिवशी १२७ जणांना मलेरिया, डेंगी आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांची लागण हाेत आहे. २०२४ मध्ये ४६ हजार ३१७ नागरिकांना या आजारांची लागण झाल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली. चालू वर्षातच जुलैपर्यंत १७ हजार २८१ लोकांना डासांमुळे होणाऱ्या आजारांची लागण झाली आहे.
२०२१
मलेरिया : १९,३०३
डेंगी : १२,७२०
चिकुनगुनिया : २,५२६
२०२४
मलेरिया : २१,०७८
डेंगी : १९,३८५
चिकुनगुनिया : ५,८५४
२०२५ (जुलैपर्यंत)
मलेरिया : ११,४२५
डेंगी : ४,३४४
चिकुनगुनिया : १,५१२
डेंगी आणि मलेरियासारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी जागरूकता आवश्यक आहे. घरांमध्ये पाणी साचू न देणे, दर आठ दिवसांनी टाकी रिकामी करणे, भांडी स्वच्छ करणे आणि मच्छरदाणी वापरणे, यांसारख्या उपाययाेजनाही गरजेच्या आहेत. ताप असेल तर ताबडतोब स्वतःची तपासणी करा.
- डॉ. विजय कांदेवाड, सहसंचालक, आरोग्य विभाग
चार वर्षांतील आकडेवारी
२४७
डासजन्य आजारांमुळे मृत्यू
६१
दरवर्षी सरासरी मृत्यू
१६४
डेंगीमुळे झालेले मृत्यू
८३
सरासरी मृत्यूचे प्रमाण
हवामान बदल अन् लोकांची निष्काळजी
डेंगी, मलेरिया आणि चिकुनगुनिया आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात हाेते. हवामान बदलामुळे संपूर्ण आग्नेय आशियात डासांचा धोका वाढला आहे. अवकाळी पाऊस, अधूनमधून येणारा पाऊस, यामुळे डासांना प्रजननासाठी अनुकूल वातावरण मिळते, असे आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.