गणेशोत्सवासाठी राज्य सरकार सज्ज

गणेशोत्सवासाठी राज्य सरकार सज्ज

Published on

गणेशोत्सवासाठी राज्य सरकार सज्ज
ऑपरेशन सिंदूरसह गडकिल्यांंच्या संकल्पनांवर भर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : राज्य सरकारने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ घोषित केले आहे. हा उत्सव पहिल्यांदा राज्य सरकार साजरा करीत असल्यामुळे या उत्सवाचे स्वरूप व्यापक करण्याकरिता सरकार प्रयत्नशील आहे. या उत्सवात सरकारचा फोकस ऑपरेशन सिंदूर, युनोस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलेले छत्रपतींचे किल्ले, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांवर असणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. २२) सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी मुंबईत राज्य, पालिका तसेच केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस आयुक्त, एमएमआरडीए, म्हाडा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई विद्यापीठ, सीमा शुल्क, बेस्ट, एमआयडीसी, मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणासह सर्वच महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी शेलार म्हणाले, गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता २२ देशांमध्ये साजरा होतो. या गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी १० कोटी रुपयांची बक्षिसे ठेवली जाणार असून, समाजमाध्यमांवरून विशेष मोहीम राबवली जावी. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ जगभरातून अपलोड करता यावेत, यासाठी विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून, यात प्रमुख मंडळांचे थेट प्रक्षेपणसुद्धा उपलब्ध होणार आहे.
...
निर्देश कोणते?
१. प्रत्येक विभागाने नाट्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम घ्या
२. युनोस्कोचा दर्जा मिळालेले छत्रपतींचे गडकिल्ले, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी या संकल्पनांवर कार्यक्रम करा
४. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करा
...
गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीत भर पडली आहे. हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.
- आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com