अनिल अंबानी यांच्या 
घरी सीबीआयचा छापा

अनिल अंबानी यांच्या घरी सीबीआयचा छापा

Published on

अनिल अंबानी यांच्या
घरावर सीबीआयचा छापा

एसबीआयची २,९२९ कोटींच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा

मुंबई : भारतीय स्टेट बॅँकेची (एसबीआय) दाेन हजार ९२९ काेटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे संचालक अनिल अंबानी यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २१ ऑगस्टला गुन्हा नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सीबीआय पथकांनी अंबानी यांचे कफ परेड येथील निवासस्थान आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या कार्यालयावर छापे मारून शोधमाेहीम राबवली.

सीबीआय प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या तक्रारीवरून रिलायन्स कम्युनिकेशन, अनिल अंबानी आणि अनाेळखी शासकीय अधिकारी, खासगी व्यक्तींविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून बँकेची फसवणूक, विश्वासघात आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तांत्रिक, कागदोपत्री पुरावे हस्तगत करण्यासाठी विशेष सत्र न्यायालयाची परवानगी घेऊन दोन ठिकाणी छापे मारण्यात आले.

एसबीआयच्या तक्रारीनुसार, अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने बँकेकडून घेतलेले कर्ज भलत्याच ठिकाणी वापरले. कर्जाची रक्कम समूह कंपन्यांत अंतर्गत व्यवहारांद्वारे वळवण्यात आली. कंपनीने बोगस देणेकरी उभे केले, अन्य कंपनी रिलायन्स इन्फ्राटेलद्वारे बिलांत सूट, नेटिझन इंजिनीअरिंग या अनिल अंबानींच्या समूहातील कंपनीस दिलेल्या भांडवली रक्कम माफ करणे असे गैरव्यवहार घडल्याचा आरोप एसबीआयने आपल्या तक्रारीत केला आहे.

याआधी एसबीआयने नोव्हेंबर २०२०मध्ये कर्जखाते आणि प्रवर्तक अनिल अंबानी यांना काळ्या यादीत टाकले होते. तसेच जानेवारी २०२१मध्ये या गैरव्यवहारांबाबत सीबीआयकडे तक्रारही केली होती; मात्र दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांमुळे बँकेने ही कारवाई मागे घेत रिलायन्स कम्युनिकेशन, अंबानी यांचे नाव काळ्या यादीतून हटविले. रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांनुसार गेल्या वर्षी बँकेने पुन्हा ती कारवाई करून सीबीआयकडे तक्रार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com