मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत

मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत

Published on

मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबई-नांदेड यादरम्यानची बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्स्प्रेस अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. २६) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या गाडीला हिरवा झेंडा दाखविला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या माहितीनुसार ही गाडी २८ ऑगस्टपासून नियमित धावणार आहे.

मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस रोज सकाळी ५ वाजता हुजूर साहिब नांदेड स्थानकातून सुटेल आणि दुपारी २.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पोहोचेल. नांदेड-मुंबई ६१० किलोमीटरचा हा प्रवास ही गाडी अवघ्या नऊ तास २५ मिनिटांत पूर्ण करणार आहे. आतापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई-जालना या मार्गावर धावत होती. प्रवाशांच्या मागणीनंतर तिचा विस्तार आता नांदेडपर्यंत करण्यात आला आहे. या गाडीला एकूण २० डबे असतील. त्यामध्ये एकत्रित बसण्याची क्षमता १,४४० इतकी आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यात ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली, आकर्षक आंतररचना, टच-फ्री बायो व्हॅक्यूम शौचालय, एलईडी लाईटिंग, प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट, वैयक्तिक टच-आधारित रिडिंग लॅम्प, रोलर ब्लाइंडसह खिडक्या आणि यूव्ही लॅम्पयुक्त वातानुकूलन प्रणालीचा समावेश आहे. यामुळे प्रवास सुखद आणि आरामदायी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com