एमएमआरडीएकडून दोन अधिकाऱ्यांचे निलंबन
एमएमआरडीएकडून दोन अधिकाऱ्यांचे निलंबन
मोनोरेल बिघाड प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : अतिरिक्त प्रवाशांमुळे मोनोरेल बंद पडल्याने जवळपास ३०० प्रवासी अडकल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमओसीएल) संबंधित दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रमकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
मुंबईत धुवाधर पाऊस सुरू असतानाच १९ ऑगस्ट रोजी मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने मोनोरेल चेंबूर-भक्ती पार्क स्थानकांदरम्यान बंद पडल्याची घटना घडली होती. त्यामुळे जवळपास ३०० हून अधिक प्रवासी अडकून पडले होते. ते गुदमरल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी मोनोरेलच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले होते. याप्रकरणी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी बैठक घेत या घटनेला प्रथमदर्शनी जबाबदार असलेले व आपले कर्तव्य योग्यरीत्या पार न पाडल्याचा ठपका ठेवत मुख्य अभियंता (सिग्नल अँड टेलिकॉम) मनीष सोनी आणि व्यवस्थापक (सुरक्षा) राजीव गीते यांना निलंबित केले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची चौकशी समिती नेमली आहे. त्यामध्ये सिडकोच्या मुख्य वाहतूक नियोजक गीता पिल्लाई, एमएमआरडीएचे सह आयुक्त आस्तिककुमार पांडे, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक हिमांशू बहिरुत यांचा समितीत समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.