अडीच हजार आंदोलकांना वैद्यकीय सेवेचा लाभ
अडीच हजार आंदोलकांना वैद्यकीय सेवेचा लाभ
मुंबई, नवी मुंबईतील मान्यवर डॉक्टरांची सेवा
मुंबई, ता. ३० : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या तब्बल अडीच हजारांहून अधिक मराठा आंदोलकांना शनिवारी (ता. ३०) विविध प्रकारच्या आजारांवर औषध-गोळ्या देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
माउली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबईच्या वतीने मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोरच रुग्णवाहिका आणि त्यामध्ये विविध प्रकारची औषधे आणून मुंबईत आलेल्या आंदोलकांची तपासणी करून त्यांना देण्यात आली. यासाठी बॉम्बे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व कॅन्सरतज्ज्ञ डॉ. दिलीप निकम, यांच्यासह डॉ. रवींद्र येवले, डॉ. मोहन थोरात यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी दिवसभर मराठा आंदोलकांना मोफत औषधोपचार आणि सेवा पुरवली.
माउली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक मोहिते यांनी सांगितले, की ‘शनिवारी अडीच हजारांहून अधिक आंदोलकांना विविध प्रकारच्या औषध-गोळ्या आणि उपचार पुरवण्यात आले. उद्या याच परिसरामध्ये किमान दोन रुग्णवाहिका आणि चार ठिकाणी वेगवेगळे टेबल ठेवून औषधोपचार, तपासणी केली जाणार आहे. मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलकांना सेवा मिळेल, यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे.’ मुंबईत दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक आजार उद्भवू शकतात, या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेले सर्व औषधे आम्ही इथे उपलब्ध करून दिली आहेत. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असे आजार जास्त आहेत आणि खाण्यात थोडा फरक पडल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो, याचा औषधसाठा आमच्याकडे भरपूर असून ते मराठा आंदोलकांना त्यांची तपासणी करून दिले जात असल्याची माहिती डॉ. मोहिते यांनी दिली.
मागील तीन दिवसांपूर्वी प्रवास करून गाव-खेड्यांतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदान आणि मुंबईत आलेल्या आंदोलकांची तपासणी करून त्यांना दिवसभर औषधोपचार करण्यात आले. उद्याही ही सेवा अगदी मोफत आणि अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
- डॉ. दिलीप निकम, वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.