उच्च शिक्षित तरुण उतरले आझाद मैदानावर

उच्च शिक्षित तरुण उतरले आझाद मैदानावर
Published on

उच्च शिक्षित तरुण उतरले आझाद मैदानावर
मेहनतीला न्याय मिळत नसल्‍याची खंत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी तिसऱ्या दिवशी राज्यभरातून आंदोलकांचा ओघ कायम आहे. यामध्ये खासगी कंपन्या, आयटी, बँकिंग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले उच्च शिक्षित तरुण-तरुणींचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्वजण आपल्या कुटुंबासह आझाद मैदानावर उतरले आहेत.
पेशाने आयटी इंजिनिअर असलेले सुमित आगळे हे कुटुंबासह पुण्याहून आझाद मैदानावर आले आहेत. मी आणि माझी पत्नी दोघेही उच्च शिक्षित आहोत. पण आरक्षणाशिवाय आमच्या मेहनतीला न्याय मिळत नाही. म्हणूनच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरल्याचे त्यांनी सांगितले. कमीत कमी आमच्या पुढच्या पिढीचे भविष्‍य सुरक्षित असावे, अशी अपेक्षा त्‍यांनी व्यक्‍त केली. सुमित यांच्याप्रमाणे असंख्य उच्च शिक्षित कुटुंबे पुणे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पनवेलसह विविध शहरांतून मुंबईत आली आहेत. उच्चशिक्षण घेतल्यानंतरही नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळत नसल्याची खंत बहुतांश आंदोलकांनी व्यक्त केली. शिक्षणासाठी मेहनत केली, खर्च केला, पण आरक्षणाशिवाय स्पर्धेत टिकाव लागणे कठीण झाल्याचे या तरुणाईने सागितले.

मुलाबाळांच्या भविष्यासाठी आलोय!
शिक्षण घेतले, मेहनत केली, पण योग्य संधी मिळाल्या नाहीत. आमचं आयुष्य संघर्षात गेलं. आता तरी आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी सरकारने आरक्षण द्यावं, म्हणूनच आम्ही कुटुंबासकट आझाद मैदानात आलो आहोत, असे एका पालकाने सांगितले.

आमचं आयुष्य संघर्षात गेलं, पण आमच्या विद्यार्थ्यांना आणि मुलांना समान संधी मिळावी, यासाठी आम्ही इथे आलो आहोत.
- निकिता वाघधरे, शिक्षिका, कर्नाटक

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आरक्षणाशिवाय स्पर्धेत टिकणे कठीण आहे. आम्ही घेतलेल्या शिक्षणाचे चीज व्हावे, ही अपेक्षा आहे.
- मृणाली जगताप, उच्चशिक्षित, संभाजीनगर

आयटी क्षेत्रात काम करताना दररोज अन्यायाची जाणीव होते. मेहनत करूनही पुढे जाण्याचे मार्ग बंद आहेत. आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आरक्षण हवेच.
- प्रियांका आगळे, आयटी इंजिनिअर, पुणे

इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, पण कामाच्या संधी मर्यादितच राहिल्या. आरक्षण असते तर वेगळे चित्र असते. म्हणून आम्ही कुटुंबासह आझाद मैदानावर आलो आहोत.
- राजेश किचमे, सिव्हिल इंजिनिअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com