देशासाठी लढलो, आता हक्कासाठी लढतोय!

देशासाठी लढलो, आता हक्कासाठी लढतोय!

Published on

देशासाठी लढलो, आता हक्कासाठी लढतोय!
आरक्षणासाठी निवृत्त सैनिक उतरले आझाद मैदानावर
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः देशाच्या संरक्षणासाठी हयात गेली; मात्र निवृत्तीनंतर शासकीय नोकरीवेळी जात पाहिली जाते. आरक्षणाशिवाय आम्हालाच दुय्यम ठरवले जाते. देशासाठी लढलो तेव्हा कोणी जात विचारली नव्हती, मग नोकरीसाठी जात का अडथळा ठरते, असा संतप्त सवाल निवृत्त सैनिकांनी उपस्थित केला. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या लढाईत निवृत्त सैनिकदेखील मैदानात उतरले आहेत.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात विविध क्षेत्रांतील मराठा बांधव उतरले आहे. यामध्ये आता निवृत्त लष्करी सैनिकही सहभागी झाले आहेत. सेनेत जात-पात नसते, फक्त शौर्य असते; पण सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जातीचा प्रश्न आडवा येतो, हे आमच्यासाठी अपमानास्पद असल्याची खंत या निवृत्त सैनिकांनी बोलून दाखवली. शासकीय नोकरीत निवृत्त सैनिकांना पुनर्नियुक्ती मिळवण्यासाठी अनेक प्रशासकीय प्रक्रियांचा सामना करावा लागतो. अर्जांची छाननी करताना जात प्रमाणपत्रावरून त्यांना अनेकदा आमचा नंबर पुढे ढकलला जातो. विशेषतः मराठा समाजातील सैनिकांना आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने ते प्राधान्य यादीतून वगळले जातात.
---
आमचे आयुष्य रणांगणात गेले. आता आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आरक्षण हवे आहे. सरकारने लक्ष न दिल्यास हा लढा आणखी तीव्र होईल.
- शिवाजी पडवळ, निवृत्त सैनिक, कोल्हापूर
.....
आरक्षण न मिळाल्यास पुढील पिढ्यांच्या आयुष्यात अंधार वाढेल. सैनिक म्हणून देशाचे रक्षण केले, आता आमच्या पुढील पिढ्यांच्या रक्षणासाठी लढतोय.
- भागवत देवळकर, निवृत्त सैनिक, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com