गेट वे ऑफ इंडिया भगवामय
गेटवे ऑफ इंडिया भगवामय
आरक्षणाच्या घोषणांनी परिसर दणाणला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मराठा आरक्षण आंदोलनाचा झंझावात आता गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोचला. आझाद मैदानात प्रचंड गर्दी उसळल्याने रविवारी (ता. ३१) शेकडो आंदोलक कुलाब्याकडे वळले. भगव्या शाली आणि फेटे घातलेले आंदोलक गेटवे ऑफ इंडियावर दाखल होताच परिसर भगवामय झाला.
मराठा आंदोलकांनी रविवारी गेटवे ऑफ इंडियाकडे कूच केली. यामुळे मरीन ड्राईव्हप्रमाणेच गेटवे ऑफ इंडियावर भगवे वादळ धडकल्याचे दिसले. शेकडोंच्या संख्येने आंदोलक गेटवे ऑफ इंडिया परिसरात दाखल झाले. परिसरात भगव्या पोशाखातील आंदोलकांची लाट उसळली होती. ‘आरक्षण आमच्या हक्काचं’, ‘मराठा समाज एकदिलाने लढतोय’ अशा घोषणांनी गेटवे परिसर दणाणून गेला. पावसाचा जोर वाढल्यानंतर सायंकाळी आंदोलकांनी पुन्हा आझाद मैदानाची वाट धरली.
गेटवेवरचा मराठा जल्लोष अविस्मरणीय होता. आमच्या भावना जगभरात पोहोचवायच्या आहेत. इतक्या ऐतिहासिक ठिकाणी समाजाची एकता पाहून डोळे पाणावले.
- हनुमंत माने, आंदोलक
इतक्या मोठ्या संख्येने आलेले आंदोलक पाहून थक्क झालो. आझाद मैदान आता अपुरे पडत आहे. आता गेटवे ऑफ इंडियाचा परिसर घोषणांनी दणाणून गेला आहे.
- अनिल सोंडगे, आंदोलक
आरक्षणाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारून गेला. गेटवे ऑफ इंडियासमोरचा आवाज महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील.
- बाबूराव पाटील-बिडकर, आंदोलक
गेटवे ऑफ इंडियावर भगव्याची लाट पाहून अंगावर रोमांच उभे राहिले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात निर्धार स्पष्ट दिसत होता.
- मच्छिंद्र जेधे, आंदोलक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

