गौरी विसर्जनानंतर महिला धडकणार :

गौरी विसर्जनानंतर महिला धडकणार :
Published on

गौरी विसर्जनानंतर महिला धडकणार
बुधवारपासून आंदोलकांची गर्दी अधिक वाढणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. त्यांच्या आंदोलनात महिला आंदोलकांची संख्या तुरळक दिसत आहे; मात्र गौरी विसर्जन झाल्यानंतर राज्यभरातील महिला आंदोलक आझाद मैदानावर धडकणार असल्याची माहिती महिला समन्वयकांनी दिली.
आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या पथकातील काही महिला आंदोलक सोडल्या, तर आंदोलनात महिलांची उपस्थिती नगण्य आहे. राज्यभरात जरांगे पाटील यांच्या आतापर्यंत झालेल्या आंदोलनात महिलांची संख्या मोठी असायची. मुंबईतील आंदोलनात मात्र महिला अद्याप दाखल झालेल्या नाहीत. राज्यभरात सध्या गणेशोत्सव सुरू आहे. तसेच आज गौराईचे आगमन झाले आहे. घराघरात गौरीपूजन केले जाते. त्यामुळेच मुंबईतील आंदोलनात अजून महिला मराठा आंदोलक उतरलेल्या नाहीत. गौरी विसर्जन झाल्यानंतर राज्यभरातील मराठा महिला आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करतील, अशी माहिती महिला समन्वयकांनी दिली.
------
वाहनात गौरीपूजन
आझाद मैदानात आलेल्या महिला आंदोलकांनी आपल्या वाहनामध्ये गौरीची स्थापना केली. गौराई आम्हा महिलांचे आराध्य दैवत आहे; पण आम्ही आता आंदोलनात आल्याने गौराई सोबतच आणली आणि स्थापना केली. आरक्षणासाठी सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे गौराईकडे घातल्याचे महिला आंदोलकांनी सांगितले.
----
गौरी विसर्जनानंतर महिला आंदोलक येणार म्हणजे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळेल. मराठा महिलांमुळे लढ्याला आणखी धार येईल.
- स्वाती जाधव पाटील, महिला समन्वयक, लातूर
---
आतापर्यंत महिलांची उपस्थिती कमी होती; पण गौरी विसर्जनानंतर महिलांचा मोठा जत्था आझाद मैदानावर दाखल झाल्यास चित्र बदलेल.
- सरोज देशमुख, महिला समन्वयक, उमरखेड
---
मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत पुरुषांसह महिलादेखील एकत्र लढत आल्या. महिला सहभागी झाल्या की हा लढा सर्वसमावेशक होईल.
- शोभा वागराळ, महिला समन्वयक, अंबड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com