कार्यकर्त्यांना आवरा अन्यथा वार्तांकन थांबवू

कार्यकर्त्यांना आवरा अन्यथा वार्तांकन थांबवू

Published on

कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा वार्तांकन थांबवू
टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे मनोज जरांगे यांना पत्र
मुंबई, ता. ३१ : आंदोलकांना आवरा, अन्यथा आंदोलनाचे वार्तांकन करणार नाही, अशा आशयाचे पत्र रविवारी (ता. ३१) टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनने रविवारी (ता. ३१) मनोज जरांगे यांना दिले आहे. एका पत्रकार महिलेसोबत शनिवारी (ता. ३०) आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असभ्य वर्तन केले, तर एका व्हिडिओ जर्नालिस्टसोबत धक्काबुक्की करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर असोसिएशनने ही भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.
या पत्रात मुंबईतील माध्यम प्रतिनिधींना आणि विशेषतः महिला पत्रकारांना आंदोलकांकडून त्रास देणे सुरू आहे. वार्तांकन करताना आंदोलकांकडून महिला माध्यम प्रतिनिधींचे कपडे ओढणे, घेरून उभे राहणे, असभ्य टिप्पणी करणे आदी प्रकार सुरू आहेत. आपण स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणता, मग महिला पत्रकारांचा अपमान कसा करता, असा सवाल असोसिएशनने केला आहे.
दरम्यान, मुंबई प्रेस क्लबने या घटनांचा तीव्र निषेध करत जरांगे यांना या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com