

वाहतूक पोलिसांचे ढिसाळ नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईत सध्या मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. आंदोलकांच्या संख्येत सोमवारी (ता. १) वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कार्यालयीन दिवस असल्याने कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची संख्याही जास्त असणार आहे. आंदोलकांची वाहने आणि मुंबईकरांची वाहने यामुळे रस्ते वाहतूक कोंडी होऊन गैरसोय होण्याची शक्यता आहे; मात्र रात्री उशिरापर्यंत मुंबई वाहतूक पोलिसांकडून रस्ते वाहतुकीचे कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नव्हते.
मराठा आरक्षणासाठी हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. सीएसएमटी आणि आझाद मैदान परिसरात त्यांनी आपली वाहने उभी केली आहेत. यामुळे काही रस्त्यांवर पूर्णपणे कोंडी झाली आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे याचा मुंबईतील दैनंदिन रस्ते वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही; परंतु सोमवारी कार्यालयीन कामाचा दिवस असल्याने मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची संख्या जास्त असते. त्यात आता आंदोलनात काही रस्ते आधीच बंद केले असून, आंदोलक किंवा गाड्या वाढल्यास वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाहतूक बदल, नो पार्किंग किंवा वाहतूक वळवणे याबाबतीत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.