अडचणीत मदतीचा हात देणारा भोईवाड्याचा महाराजा
अडचणीत मदतीचा हात देणारा भोईवाड्याचा महाराजा
मुंबईतील सर्वात उंच पूजेची मूर्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : परळ भोईवाड्यामध्ये १९४९ पासून बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने थोर बाळ गंगाधर टिळक यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सुरू केली. समाजाच्या उन्नतीसाठी विविध जाती, समुदाय आणि धर्मातील लोकांना एकत्र यावे. समाजातील लोकांना अडचणीत मदत मिळावी हा हेतू होता.
परळ भोईवाड्यात बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असे मुंबईतील कदाचित एकमेव मंडळ आहे, ज्या मंडळाची २२ फूट उंच अशी एकच पूजेची मूर्ती आहे. म्हणूनच मुंबईतील सर्वात उंच पूजेची मूर्ती म्हणून दखल घेतली जाते. आपण ज्या समाजात वावरलो, त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी उत्सव काळामध्ये जी वर्गणी जमा केली जाते, त्या वर्गणीतून लोकांसाठी आरोग्य, रक्तदान शिबिर, कॅन्सरग्रस्त बाल रुग्णांना मदत, आदिवासी बांधव, अनाथ मुलांसोबत दिवाळी सण साजरा करणे उपक्रम राबविले जातात. कोरोना महामारीमध्ये लोकांना दूध व अन्नधान्य पुरवठा केला होता. आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
परळ भोईवाड्यातील बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध उपक्रम राबविते. या समाजपोयोगी कार्याची दखल व्होक्हार्ट रुग्णालयाने घेतली. २०२२ मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल मंडळाचा गौरव केला होता.
कर्मचाऱ्यांचा सन्मान
महाराष्ट्रदिन व जागतिक कामगारदिनानिमित्त मंडळाच्या वतीने विभागीय डॉक्टर, सफाई कर्मचारी, पोलिस बांधव व पोस्टमन यांच्या अविरत सेवेचे आभार मानण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंडळाच्या वतीने विभागातील पोलिस ठाण्यांना स्टेशनरी सामानाचे वाटप करण्यात आले.
दिवाळीचा पहिला दिवा आदिवासींच्या दारी
दिवाळी म्हणजे रोषणाई व आतषबाजीचा सण होय, परंतु महाराष्ट्रातील काही दुर्गम आदिवासी भागात सरकारच्या नाकर्तेपणामुळे अजूनही वीज व इतर जीवनावश्यक सोयीसुविधा नाहीत, म्हणूनच बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रायगड जिल्यातील रोहा तालुक्यात फुगरेवाडी या आदिवासी भागात जाऊन ब्लॅंकेट्स, गृहउपयोगी वस्तू, फराळाचे वाटप करून त्यांच्या जीवनातील थोडा का होईना अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. दिवाळीचा पहिला दिवा आदिवासींच्या दारी प्रज्वलित केला जातो.
गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून ही एक सामाजिक जबाबदारी आहे. समाजाचे ऋण असतात फेडायला हवेत. सामाजिक बांधिलकी गरजूंना मदत मिळाली पाहिजे. हे भान राखून मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
संजय कदम, अध्यक्ष, बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ- भोईवाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.