आंदोलनाचा निर्यातीला फटका

आंदोलनाचा निर्यातीला फटका

Published on

आंदोलनाचा निर्यातीला फटका
ट्रक वेळेत न पोहोचल्याने जहाज निघून गेले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईला जाणारे सर्व प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प झाली होती. अटल सेतू, सायन-पनवेल महामार्ग तसेच पूर्व मुक्त मार्गावरील अवजड वाहने बंद होती. त्यामुळे जेएनपीटीला वेळेत माल न पोहोचल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
मुंबई बंदराकडे जाताना मालवाहतूक अडकल्याने निर्यातदार, आयातदार आणि प्रकल्प कार्गो ऑपरेटरला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. ‘जबेल अली नाइन’ हे जहाज २ सप्टेंबरला निघणार होते. त्यासाठी अवजड उपकरणे, यंत्रसामग्री १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी बंदरात पोहोचणे आवश्यक होते; परंतु अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आल्याने कोट्यवधीचा फटका बसला आहे. अशाप्रकारे शेकडो अवजड वाहने अडकून पडली आहेत. रिकामे कंटेनर, डिमरेज, डिटेन्शन शुल्क आणि दंड वाढत आहेत, तर चालक मूलभूत सुविधांशिवाय अडकून पडले आहेत, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सल्लागार बाल मलकीत सिंग म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com