पोलिसांचे ऑपरेशन क्लीनअप
पोलिसांचे ऑपरेशन क्लीनअप
न्यायालयाच्या आदेशांची ढाल मिळताच कारवाई
मुंबई, ता. २ ः उच्च न्यायालयाच्या आदेशांची ढाल मिळताच सोमवार (ता. १) संध्याकाळपासून मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलकांना आवरते घेण्यास सुरुवात केली आणि मंगळवारी (ता. २) दुपारपर्यंत आझाद मैदान परिघातील वाहने हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले.
सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण चौधरी, उपआयुक्त डॉ. प्रवीण मुंढे, नवनाथ ढवळे आदी अधिकाऱ्यांनी बंदोबस्तावर तैनात शीघ्र कृती दल आणि पोलिसांच्या साथीने प्रथम आंदोलकांची वाहने वाडीबंदर, वाशी येथे मार्गस्थ केली. त्यानंतर सीएसएमटीसमोरील चौकात गेले पाच दिवस तळ ठोकून बसलेल्या आंदोलकांना रस्त्यावरून आझाद मैदान आणि पदपथांवर आणून वाहतूक सुरू करून घेतली. मंगळवारी सकाळपासून पोलिस आणि आंदोलन समन्वयक मेगाफोनद्वारे आंदोलकांना उच्च न्यायालयाचे आदेश मानण्याचे आवाहन करीत होते.
...
रुग्णवाहिकेच्या आडून फोडली कोंडी
काही आंदोलक या कारवाईवेळी अडून बसले. त्यांनी पोलिसांशी वाद घातला. तेथे जमाव जमू लागला. आंदोलक वाहनांच्या टपावर चढून नारे देऊ लागले. प्रसंगावधान राखत पोलिसांनी काही काळासाठी माघार घेतली; मात्र त्याच वेळी एक रुग्णवाहिका सायरन देत या जमावाच्या दिशेने आली. पोलिसांनी ती संधी साधून आंदोलकांना रुग्णवाहिकेस रस्ता मोकळा करून देण्याचे आवाहन केले. आंदोलक पांगताच रस्त्याचा ताबा घेतला आणि आंदोलकांवरही नियंत्रण मिळवले.
...
पाच दिवसांनी वाजल्या पोलिसांच्या शिट्या
आंदोलकांनी पाच दिवस सीएसएमटी स्थानक आणि पालिका मुख्यालयासमोरील चौकाचा ताबा घेतला होता. या कालावधीत पोलिसांनी संयमी भूमिका घेतली होती; मात्र उच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच मंगळवारी या परिघात तैनात पोलिसांनी प्रथमच शिट्या वाजवून आपले अस्तित्व दाखवून देत आंदोलकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवले. सीएसएमटी स्थानकाच्या प्रत्येक फलाटावर विसावलेल्या आंदोलकांना पोलिसांनी आझाद मैदानात पाठवले. त्यामुळे मंगळवारी दुपारी सीएसएमटी स्थानकही मोकळे झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.