मुंबईत आतापर्यंत २,२०७ मिमी पाऊस
मुंबईत आतापर्यंत २,२०७ मिमी पाऊस
गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत आतापर्यंत २,२०७ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या सुमारे ९३ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशीपर्यंत २५१९.९ मिमी पाऊस पडला होता. यंदा एकूण पावसात घट झाली असून, विशेषतः पूर्व उपनगरात कमी पाऊस झाला आहे.
शहर विभागात यंदा १७२५.७७ मिमी, पूर्व उपनगरात २१७६.०३ मिमी आणि पश्चिम उपनगरात २१३५.६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात सरासरीच्या ८२ टक्के, पूर्व उपनगरात ९१ टक्के आणि पश्चिम उपनगरात ९३ टक्के पाऊस पडला आहे.
कुलाबा व सांताक्रूझ वेधशाळा आकडेवारीचा विचार केला असता कुलाबा वेधशाळेत यंदा २२०८.१ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या ७९.६४ टक्के आहे, तर सांताक्रूझ वेधशाळेत २४६६.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीच्या ९५.२७ टक्के आहे.
कुलाबा व सांताक्रूझ वेधशाळेची आकडेवारी
*कुलाबा वेधशाळेच्या नोंदीप्रमाणे आतापर्यंत २२०८.१ मिमी पाऊस झाला असून, तो वार्षिक सरासरीच्या ७९.६४ टक्के आहे.
*सांताक्रूझ वेधशाळेत २४६६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीच्या ९५.२७ टक्के आहे.
तुलनात्मक पाऊस :
कुलाबा वेधशाळा
२०२४ : २,०१५ मिमी (७९.६४ टक्के)
२०२५ : २२०८.१ मिमी (११.१७ टक्क्यांनी वाढ)
कुलाब्यात यंदा पावसाचे प्रमाण जास्त आहे.
सांताक्रूझ वेधशाळा
२०२४ : २,३१९ मिमी (१०८.६६ टक्के)
२०२५ : २४६६.५ मिमी (९५.२७ टक्के)
सांताक्रूझमध्येही पाऊस वाढला आहे. (२४७ मिमीने), पण टक्केवारी सरासरीपेक्षा थोडी कमी आहे.
मुंबई विभागनिहाय सरासरी (३ सप्टेंबरपर्यंत)
शहर विभाग :
२०२४ - २०१५ मिमी
२०२५ - १७२५.७७ मिमी
* शहरात पाऊस कमी झाला आहे.
पूर्व उपनगर :
२०२४ - २,३१९ मिमी
२०२५ - २,१७६.०३ मिमी
* पूर्व उपनगरातही पावसात घट आहे.
पश्चिम उपनगर
२०२४ - २,४६६.५ मिमी
२०२५ - २१३५.६३ मिमी
* पश्चिम उपनगरातही घट आहे.
एकूण मुंबई
२०२४ : २,५१९.९ मिमी
२०२५ : २,२०७ मिमी
* एकूण मुंबईत मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे.
हवामान अंदाज
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.