पावसाची उघडझाप मुंबईकरांच्या डोक्याला ताप - साथीचे आजार वाढले

पावसाची उघडझाप मुंबईकरांच्या डोक्याला ताप - साथीचे आजार वाढले

Published on

मुंबईत साथीचा ताप
डेंगी, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : बदललेले वातावरण तसेच मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली अस्वच्छता, यामुळे मुंबईत डेंगी, गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हर यांसारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाणी, खराब अन्न, डास आणि किटक यांचा प्रादुर्भाव आणि हवामानातील बदल यामुळे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रुग्णालये तसेच खासगी दवाखान्यांमध्ये ताप, अंगदुखी, पोटदुखी आणि श्वसनाच्या तक्रारींसाठी नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमध्ये ताप, अंगदुखी, पोटदुखी आणि श्वसनाच्या तक्रारींसाठी रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. विशेषत: बालक आणि वृद्धांमध्ये हे आजार अधिक दिसून येत आहेत. नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य विभागाने प्रत्येक वॉर्डात फिरती आरोग्य पथके कार्यरत ठेवली असून, डास निर्मूलन मोहीम, रक्त तपासणी यासारख्या उपाययोजना सुरू आहेत. रुग्णालयांत पुरेशी औषधे आणि ऑक्सिजनची उपलब्धता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जेजे रुग्णालयाचे मेडिसिन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.  मधुकर गायकवाड यांनी सांगितले, की मुंबईतील वातावरण बदलले असून, सध्या व्हायरल फिव्हरचा धोका वाढला आहे. मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सुमारे ५० टक्के मलेरिया रुग्ण घरी बरे होतात. परंतु काही रुग्ण अ‍ॅक्यूट हेमोलिटिक युरेमिक सिंड्रोम (एचयूएस) घेऊन येत आहेत, ज्याचा थेट किडनीवर परिणाम होतो. हा ट्रेंड काही दिवस असाच सुरू राहणार असून रुग्णसंख्या वाढू शकते.

आजारांची लक्षणे
डेंगी : अचानक ताप, अंगदुखी, लाल चट्टे, डोळ्यांमागे वेदना
गॅस्ट्रो : पोटदुखी, वारंवार शौच, अशक्तपणा, उलट्या
स्वाइन फ्ल्यू : सतत ताप, खोकला, खवखव, श्वसनाचा त्रास
कोविड-१९ / व्हायरल फिव्हर : ताप, सर्दी, खोकला, थकवा, अंगदुखी
हिपॅटायटिस (ए व ई) : डोळे, हात पिवळे होणे, थकवा, उलटी, पोटदुखी

आरोग्य विभागाचे आवाहन
नागरिकांनी घराभोवती पाणी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी, उकळलेले किंवा शुद्ध पाणीच प्यावे, पौष्टिक आहार घ्यावा तसेच किरकोळ लक्षणांकडेही दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
गर्दीच्या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने फिरत असल्याने बाहेरचे खाणे टाळावे. पायाला जखम असल्यास चिखल किंवा साचलेल्या पाण्यात पाय न देण्याची खबरदारी घ्यावी. महापालिकेकडून मंडप परिसर आणि नागरी वस्तीत धूर फवारणी वाढवून नागरिकांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

रुग्णालये आणि दवाखाने भरले
रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमध्ये ताप, अंगदुखी, पोटदुखी आणि श्वसनाच्या तक्रारींसाठी रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. विशेषत: बालक आणि वृद्धांमध्ये हे आजार अधिक दिसून येत आहेत.

महापालिकेचे आवाहन
घराभोवती पाणी साचू देऊ नका
स्वच्छता राखा
उकळलेले किंवा शुद्ध पाणी प्या
पौष्टिक आहार घ्या
लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

साथीच्या आजारांची आकडेवारी (जानेवारी ते ऑगस्ट)
आजार रुग्ण
मलेरिया ४,८२५
डेंगी १,५६४
चिकुनगुनिया ३२८
लेप्टोस्पायरोसिस ३१६
गॅस्ट्रो ५,५१०
हिपॅटायटिस (ए व ई) ७०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com