जीवाचे बरेवाईट झाल्यास
सरकारची जबाबदारी

जीवाचे बरेवाईट झाल्यास सरकारची जबाबदारी

Published on

जीवाचे बरेवाईट झाल्यास
सरकारची जबाबदारी

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची याचिका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषसिद्ध आरोपी नासिर अब्दुल कादर केवल ऊर्फ नासिर ढकलाने कारागृह प्रशासनावर गंभीर आराेप केले आहेत. वैद्यकीय सुविधाअभावी आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरावे, अशी मागणी त्याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.

वारंवार मागणी करूनही कारागृह प्रशासन पुरेसे वैद्यकीय उपचार देण्यात अपयशी ठरले आहे. आपल्याला हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. यावर्षी एप्रिलमध्ये सर जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. २३ एप्रिलला रुग्णालयातून साेडल्यानंतर औषधांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला आणि तपासणीसाठी रुग्णालयात येण्यास रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याचा दावा नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या केवल यांनी याचिकेत केला आहे.

नियमित तपासणीसाठी परवानगी देण्याची विनंती सीएमओ आणि तुरुंग अधीक्षकांकडे अनेक वेळा करूनही तुरुंग अधिकाऱ्यांनी एस्कॉर्टच्या अनुपलब्धतेची सबब पुढे करून परवानगी नाकारली. असे केवलने वकील फरहाना शाह यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत म्हटले आहे. आपण दोषसिद्ध आरोपी असलो तरीही पुरेसे वैद्यकीय उपचार मिळण्यास पात्र आहोत. जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी आपण निरोगी राहावे, यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांनी योग्य ते वैद्यकीय उपचार पुरविणे आवश्यक असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तुरुंग अधिकारी योग्य वैद्यकीय उपचार देऊ शकत नसतील, तर कुटुंबीयांना त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी देण्याची मागणी याचिकेत केली आहे.
----
कटाप्रकरणी जन्मठेप
केवलला जुलै १९९५मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर २००७मध्ये टाडा न्यायालयाने त्याला पाकिस्तानमध्ये शस्त्र प्रशिक्षण घेतल्याबद्दल आणि त्याच्या सहआरोपींच्या निवासस्थानी कट रचण्याच्या बैठकींत सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com