धमकीच्या संदेशाने पोलीस यंत्रणा सतर्क

धमकीच्या संदेशाने पोलीस यंत्रणा सतर्क

Published on

धमकीच्या संदेशाने
पोलिस यंत्रणा सतर्क

मुंबई, ता. ५ : शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर शुक्रवारी लष्कर ए जिहादी या कथित दहशतवादी संघटनेच्या नावे धमकीचा संदेश आला. १४ पाकिस्तानी दहशतवादी ४०० किलो आरडीएक्ससह भारतात घुसले असून, मुंबईत ३४ वाहनांद्वारे मानवी बॉम्बस्फोट घडवून आणले जातील. या हल्ल्यात माेठी मनुष्यहानी होईल, अशी धमकी या संदेशात देण्यात आली आहे.

दोन वर्षांत वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर बॉलीवूड अभिनेत्यांपासून शहरातील महत्त्वाची, संवेदनशील आस्थापना, प्रार्थनास्थळे, रेल्वेस्थानके, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस,
विमानतळे, विमाने, शाळा, महाविद्यालये, पंचतारांकित हॉटेल्स आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचे अनेक संदेश आले आहेत. मुंबई पोलिसांनी प्रत्येक संदेशानुसार संबंधित ठिकाणी झाडाझडती घेतली असता त्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच अफवा पसरविणाऱ्यांपैकी बहुतांश व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे तपासातून स्पष्ट झाले होते.
शनिवारी अनंत चतुर्दशी अर्थात सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनासाठी लाखो गणेशभक्त शहरातील प्रमुख विसर्जनस्थळी गर्दी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने हा संदेश गांभीर्याने घेतला आहे. स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने शोधाशोध, प्रतिबंधात्मक उपाय योजण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले. हा संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीविरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून या व्यक्तीची ओळख आणि ठावठिकाणा तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com