७५ हजार तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण 
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमीत्त उपक्रम

७५ हजार तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमीत्त उपक्रम

Published on

७५ हजार तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
मुंबई, ता. ५ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त कौशल्य विभाग राज्यातल्या ७५ हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण देईल, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
येत्या १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत हा रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा सुरू राहणार असून १ ऑक्टोबरला राज्यातील ४१९ आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांची सुरुवात होईल. कौशल्य विकासाद्वारे युवक व युवतींचे सक्षमीकरण हा यामागचा मूळ उद्देश आहे; मात्र अनेकांना नियमित कार्यशाळेत जाऊन वेळेअभावी किंवा इतर कारणास्तव प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाही, अशा होतकरू युवकांना आणि युवतींना या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात अल्पकालीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
राज्यातील आयटीआयमध्ये सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबतच अल्पदरात युवक आणि युवतींसाठी रोबोटिक, सौरऊर्जा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आणि व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक विकासासंदर्भात अत्याधुनिक अभ्यासक्रम चालवले जातील.
उद्योगांना पूरक स्वयंरोजगाराच्या संधी या अल्पकालीन अभ्यासक्रमाच्या माध्यमाने तरुणांना उपलब्ध होतील. विशेष म्हणजे, सध्या आयटीआयचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींकडून या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या https://admission.dvet.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. उपलब्ध जागांचा विचार करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून युवकांनी त्वरित या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करावी, असे आवाहनही लोढा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com