अभियांत्रिकीच्या ६० हजार जागा रिक्त

अभियांत्रिकीच्या ६० हजार जागा रिक्त

Published on

अभियांत्रिकीच्या ६० हजार जागा रिक्त
संस्था स्तरावरील फेरीमध्ये भरल्या जाणार
मुंबई, ता. ५ : राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीच्या (इंजिनिअरिंग) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) चार प्रवेश फेऱ्यांनंतर यंदा एकूण एक लाख ४१ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या विविध शाखेसाठी प्रवेश निश्चित केले आहेत. राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत अद्यापही सुमारे ६० हजार जागा रिक्त राहिल्या असल्याने त्या जागा आता संस्था स्तरावरील फेरीतून १३ सप्टेंबरपर्यंत भरल्या जाणार असल्याची माहिती असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल)च्या आकडेवारीनुसार, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा सर्वाधिक कल हा संगणकासह नवीन विकसित झालेल्या एआय आदी शाखांकडे दिसून आला आहे. त्यातही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेच्या प्रवेशाला सर्वाधिक पसंती दिसून आली आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या ३२ हजार १७१ जागांपैकी तब्बल २२ हजार ९५५ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर केवळ नऊ हजार २०० जागांवर प्रवेश होऊ शकले नाहीत.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठीही मोठी मागणी दिसून आली. ज्यात १९ हजार ८६० जागांपैकी १५ हजार २६३ प्रवेश झाले, तर माहिती तंत्रज्ञानाच्या शाखेत उपलब्ध असलेल्या १७ हजार ३११ जागांपैकी १२ हजार ५२० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, यात विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल दिसून आला आहे.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील विद्यार्थ्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सायन्सशी संबंधित विशेष शाखांनाही विद्यार्थ्यांनी मोठी पसंती दर्शविली आहे. यात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स’ शाखेत १० हजार १३० जागांपैकी ७,५०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. ‘कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग (एआय अँड एमएल)’मध्ये पाच हजार ७७८ जागांपैकी चार हजार ४४६ जागा भरल्या गेल्या असून, यात राज्यातील विद्यार्थी या नवीन विकसित झालेल्या शाखांकडे अधिक प्रवेश घेण्यासाठी पसंती दर्शवत असल्याचे दिसून आले आहे.
---
मेकॅनिकल, सिव्हिलला कमी प्रतिसाद
मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसारख्या पारंपरिक शाखांना विद्यार्थी आकर्षित करण्यात अडचणी येत आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये २३ हजार ८५३ जागांची क्षमता होती, परंतु केवळ १५ हजार २३३ विद्यार्थ्यांनी ही शाखा निवडली. त्यामुळे ८,६०० पेक्षा जास्त जागा रिक्त राहिल्या. सिव्हिल इंजिनिअरिंगला तर त्याहूनही कमी मागणी होती, १७,४५० जागांपैकी फक्त १०,९३९ प्रवेश झाले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्येही घट दिसून आली आहे. १३,६४९ जागांपैकी ८,७१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com