कृत्रिम तलावांना पसंती

कृत्रिम तलावांना पसंती

Published on

कृत्रिम तलावांना पसंती
मुंबईत एक लाख ९७ हजार ११४ मूर्तींचे विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांनी पर्यावरणपूरकतेचा आदर्श ठेवत कृत्रिम तलावांत मोठ्या प्रमाणावर मूर्ती विसर्जन केले. महापालिकेच्या योग्य नियोजनामुळे आणि नागरिकांच्या जागरूक सहभागामुळे अनंत चतुर्दशीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. ६० टक्क्यांहून अधिक मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेने शहरात २९० पेक्षा अधिक कृत्रिम तलाव उभारले होते. जनजागृती मोहीम, पर्यावरण संरक्षणाची भावना आणि शाळा-मंडळांचा सहभाग यामुळे यंदा मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांनाच सर्वाधिक पसंती मिळाली.
रविवारी (ता. ७) संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण एक लाख ९७ हजार ११४ मूर्ती विसर्जित झाल्या. त्यापैकी एक लाख ८१ हजार ३७५ घरगुती, १० हजार १४८ सार्वजनिक तर गौरी व हरतालिका मिळून पाच हजार ५९१ मूर्तींचा समावेश आहे. यापैकी लक्षणीय प्रमाणात मूर्ती कृत्रिम तलावांत विसर्जित झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ५९४ निर्माल्य कलश आणि ३०७ विशेष वाहनांद्वारे विसर्जनस्थळांवरून ५०८ मेट्रिक टन निर्माल्य संकलित केले. निर्माल्याचे योग्य प्रकारे पुनर्वापर आणि प्रक्रिया केली जाणार आहे.
अकराव्या दिवशी (६ सप्टेंबर) एकूण ३६,७४६ मूर्ती विसर्जित झाल्या. त्यामध्ये ५,९३७ सार्वजनिक, ३०,४९० घरगुती व ३१९ गौरी-हरतालिका मूर्तींचा समावेश होता.

महानगरपालिकेचे सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांनी ७० नैसर्गिक स्थळं आणि कृत्रिम तलावांवर दिवसरात्र कार्य केले. सुरक्षा, वैद्यकीय सोय, प्रकाशयोजना, क्रेन, तराफे अशा सर्व सुविधा उपलब्ध असल्याने विसर्जन सुरळीत पार पडले. मुंबईकरांनी कृत्रिम तलावांत विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे भक्कम पाऊल टाकले आहे.

दिवसनिहाय आकडेवारीनुसार –
दीड दिवस : ६०,४३४
पाच दिवस : ४०,२३०
सात दिवस : ५९,७०४
अकरा दिवस : ३६,७४६
एकूण : १,९७,११४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com