दुचाकी, तीनचाकी वाहने इलेक्ट्रिकच वापरा

दुचाकी, तीनचाकी वाहने इलेक्ट्रिकच वापरा

Published on

(जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिन)

दुचाकी, तीनचाकी वाहने इलेक्ट्रिकच वापरा

प्रदूषण समस्येवर वाहतूकतज्ज्ञांचे मत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : सध्या पर्यावरण रक्षणाच्या दृष्‍टीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्थेसह दुचाकी आणि तीनचाकी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावल्यास त्याचा पर्यावरणाच्या दृष्‍टीने अधिक फायदा हाेईल, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्‍यक्त केले.

पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५’ जाहीर केले आहे. हे धोरण १ एप्रिल २०२५ पासून ते ३१ मार्च २०३० पर्यंत लागू असून, या नवीन धोरणांतर्गत १३ ऑगस्टपर्यंत राज्यात ५४,०४१ वाहनांची नोंदणी झाली आहे. २३ मे रोजी धोरण आले असले तरी १ एप्रिलपासून सवलत लागू आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल सरकारकडून राबवले जाणार आहे. याअंतर्गत २०३० पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुढील पाच वर्षांसाठी तब्बल एक हजार ९९३ कोटी रुपयांच्या निधींच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे.
==
काेणत्या वाहनांना किती सबसिडी?
दुचाकी : १० हजार रुपये
तीनचाकी : ३० हजार रुपये
तीनचाकी मालवाहू : ३० हजार रुपये
चारचाकी (परिवहनेतर) : १.५० लाख रुपये
चारचाकी (परिवहन) : २ लाख रुपये
चारचाकी हलकी मालवाहू : १ लाख
एसटी बस : २० लाख रुपयांपर्यंत
===
महामार्गांवर टाेलमाफी!
राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५अंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग आणि शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेट्रिक वाहनांना आता टोलमाफी आहे. नागरिकांनी अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
====
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ (१ एप्रिलपासून)
वाहन प्रकार : सबसिडी पात्र वाहने
दुचाकी : १,००,०००
तीनचाकी (रिक्षा) : १५,०००
तीनचाकी (टेम्पो) : १०,०००
चारचाकी (खासगी) : १०,०००
चारचाकी (प्रवासी वाहन) : २५,०००
चारचाकी (हलकी माल वाहतूक) : १०,०००
ई-बस : १,५००
चारचाकी मालवाहतूक : १,०००
शेतीसंबंधी ट्रॅक्टर : १,०००
एकूण : १,७५,०००
==
वाहन प्रकार : वाहन नोंदणी (२३ मे ते १३ ऑगस्टपर्यंत)
दुचाकी - ४२,३८९
रिक्षा - १,८८९
टेम्पो - ३१०
चारचाकी (खासगी) - ७,९४२
चारचाकी (प्रवासी) - ३१०
चारचाकी (हलकी मालवाहतूक) - ४००
ई-बस - ३९९
चारचाकी मालवाहतूक - ४००
ट्रॅक्टर - २
एकूण - ५४,०४१
===
वाहनांमुळे २० ते २५ टक्के प्रदूषण हाेते. मुंबईसारख्या शहरात दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे प्रमाण जास्त आहे. ही वाहने इलेक्ट्रिक असल्यास माेठा दिलासा मिळेल. सध्याच्या आकडेवारीवरून या वाहनांना प्राधान्य दिले जात आहे, ही सकारात्मक बाब आहे.
- भगवान केसभट, संस्थापक, वातावरण
==
दुचाकी आणि तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात वाढ हाेत आहे, हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले संकेत आहेत. एकूण वाहनसंख्या पाहता इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण कमी आहे.
- ऋषी अगरवाल, संचालक, मुंबई सस्टेनॅबिलिटी सेंटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com