मुंबई, दिल्ली आयआयटींचा शाश्वत ऊर्जा प्रणालीसाठी रोडमॅप

मुंबई, दिल्ली आयआयटींचा शाश्वत ऊर्जा प्रणालीसाठी रोडमॅप

Published on

शाश्वत ऊर्जा प्रणालीसाठी रोडमॅप
मुंबई, दिल्ली आयआयटींसह एनआयएएसचा अभ्यास

मुंबई, ता. ६ : देशातील शाश्वत ऊर्जेसंबंधात आयआयटी मुंबई आणि आयआयटी दिल्लीतील संशोधकांनी एक रोडमॅप तयार केला आहे. यात महाराष्ट्रासह पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांच्या समन्वयातून वीजनिर्मितीत मोठी बचत, कार्यक्षमतेत वाढ आणि ऊर्जा सुरक्षा साध्य होऊ शकते, असा निष्कर्ष मुंबई, दिल्ली येथील आयआयटी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज (एनआयएएस) यांच्या संयुक्त अभ्यासातून समोर आला आहे. या निष्कर्षांतून देशात २०३०पर्यंतच्या अक्षय ऊर्जा लक्ष्यपूर्तीकडे वाटचाल करताना देशातील संशोधकांनी वीजनिर्मिती आणि ग्रिड प्रचालनाचे बदलते गणित उलगडून दाखण्यात आले असून, यासाठी एक संगणकीय मॉडेलही तयार करण्यात आले आहे.

आयआयटीच्या संशोधकांनी मांडलेल्या अभ्यासात देशा ऊर्जा निर्मितीच्या वापरासाठी करण्यात येते असलेला कोळशाचा वापर कमी करणे आणि ऊर्जा साठवणूक वाढवणे हे भारताच्या अक्षय ऊर्जा उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी नवे ऊर्जा मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यात संशोधकांनी एक सूक्ष्म व बारकाईने कार्य करणारे संगणकीय मॉडेल तयार केले आहे, जे वीजनिर्मिती आणि ग्रिड व्यवस्थापन दोन्हींचा बारकाईने अभ्यास करते.
आयआयटी दिल्लीचे संशोधक निखिल तेजेश वेंकटरमणा यांनी सांगितले, ‘‘आमच्या अभ्यासात आम्ही ऊर्जा प्रणालीचा एक तपशीलवार आणि वास्तववादी दृष्टिकोन अवलंबला. अक्षय ऊर्जा वाढवताना कार्यक्षमतेचा आणि खर्चाचा समतोल कसा राखता येईल, हे आम्ही दाखवून दिले.’’
आयआयटी मुंबईतील रामादेसिगन यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासाचा करण्यात आला असून, यात ‘समन्वित नियोजन, लक्षित बॅटरी साठवणूक आणि सुधारित पारेषण प्रणाली यांचा समन्वय साधल्यास भारत स्वस्त, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक ऊर्जा भविष्याकडे वाटचाल करू शकतो, असे मत त्यांनी नोंदविले आहे. समन्वित प्रणालीमुळे एकूण स्थापित क्षमतेची गरज ३१४ गिगावॉटवरून २८८ गिगावॉटपर्यंत घटते, तर उत्पादनाचा खर्च १०-१५ टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे सर्व राज्यांना महागडे बॅकअप प्रकल्प उभारण्याची आवश्यकता उरत नाही.
...
१२ लाख कोटींची बचत शक्य
अभ्यासात भारताच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील नऊ राज्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या प्रदेशात देशाच्या विजेच्या एकूण मागणीपैकी सुमारे ५६ टक्के वीज वापरली जाते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जर ही राज्ये स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी एकत्रित नियोजन करतील, तर देशाला २०३० पर्यंत जवळपास १२ लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा निष्कर्षही या अभ्यासातून मांडण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com